बसप्रवासात महिलेच्या पर्समधून २ लाख ३८ हजारांचे दागिने चोरीला
दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास नांदेड-हुमनाबाद मार्गावरील लातूर फाटा, नांदेड येथे कर्नाटक बस क्रमांक KA-38 F-1268 मधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेले. अज्ञात चार महिलांनी संगनमत करून चोरी केल्याचा आरोप आहे. चोरीस गेलेल्या ऐवजाची एकूण किंमत सुमारे २ लाख ३८ हजार १५० रुपये आहे. याप्रकरणी फिर्यादी तहसीन बानो मोहम्मद गौस, वय ५० वर्षे, रा. हिलाल नगर, देगलूर नाका, नांदेड यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२८८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि/नाईक करीत आहेत.
माहूरमध्ये शेतातील सोयाबीन चोरी
दुसरी घटना माहूर तालुक्यातील हडसणी शिवारात घडली. दि. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हडसणी शिवारातील शेतातून कापणी करून ठेवलेले सोयाबीन चोरीस गेले. या सोयाबीनची अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात प्रतिभा आशीर्वाद जाधव, आशीर्वाद गणपत जाधव, पंजाबराव हनुमंतराव सांगावकर, बेबी पंजाबराव सांगावकर, शुभम दादाराव शिंदे, दादाराव साहेबराव शिंदे, अवधूत दिगंबर जाधव आणि अमोल पंजाबराव सांगावकर, सर्व रा. हडसणी, ता. माहूर, यांच्यावर संगनमत करून सोयाबीन चोरी केल्याचा आरोप आहे. फिर्यादी पुष्पा सिताराम कदम, वय ६५ वर्षे, रा. हडसणी, ता. माहूर यांच्या तक्रारीवरून माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. BNS कलम ३०३(२), ३५२, ३५१(१)(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोना/गेडम करीत आहेत.
