Thane Thackeray Women Wing Challenges Minakshi Shinde Over Purnekar Murder


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटावर केलेल्या आरोपांना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “गोर

.

तसेच, “ज्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्ही महापौरपदाच्या खुर्चीवर बसलात, त्या रश्मी वहिनी ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलताना स्वतःची लायकी लक्षात ठेवा; अन्यथा आमची महिला आघाडी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरून चोख उत्तर देतील,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

आदित्य ठाकरे किंवा राऊतांनी दबाव आणला नाही; तो कुटुंबीयांचा आक्रोश होता

संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पोलिसांवर दबाव आणून नावे गोवल्याच्या आरोपांचा समाचार घेताना रेखा कोपकर म्हणाल्या, “घटना घडल्याच्या पहिल्या क्षणापासून प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर आणि कुटुंबीयांच्या तोंडी मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचीच नावे संशयित म्हणून होती. मात्र, ठाणे पोलिसांनी सुरुवातीला नोंदवलेल्या मूळ एफआयआरमध्ये ही दोन नावे समाविष्ट केली नाहीत. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळेच पोलिसांनी ही नावे वगळली होती का?”

“पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या राम पूर्णेकर आणि स्थानिक नागरिकांनी निर्णय घेतला की, जोपर्यंत संशयितांची नावे नोंदवली जात नाहीत, तोपर्यंत वडिलांचा मृतदेह हलवणार नाही. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यात पोहोचले.”

सप्लिमेंटरी एफआयआरनंतरच अंत्यसंस्कार

“नेत्यांनी मध्यस्थी करून केवळ कुटुंबीयांची व्यथा पोलिसांसमोर मांडली. पोलिसांनी जेव्हा पुरवणी जबाबात या दोघांची नावे संशयित म्हणून नोंदवली, त्यानंतरच राम पूर्णेकरने वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. यात मृतदेहाची विटंबना नेत्यांनी नाही, तर पोलिसांच्या दिरंगाईमुळे झाली होती.”

रश्मी वहिनींवर बोलताना लायकी आठवा; चार वर्षांपूर्वीचे उपकार विसरलात का?

मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेतलेल्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत कोपकर म्हणाल्या, “महापौर झाल्यानंतर ज्या सन्माननीय व्यक्तीने तुम्हाला खुर्चीवर सन्मानाने बसवले, त्या आमच्या रश्मी वहिनी ठाकरे यांच्यावर गलिच्छ आणि खालच्या थराला जाऊन आरोप करताना शरम वाटायला हवी होती. चार वर्षांपूर्वी ज्यांचे पाय धुऊन पाणी पीत होतात, त्यांच्यावरच आज तोंडसुख घेताय?”

महिला आघाडी रस्त्यावर उतरणार

“आमच्या नेत्यांवर किंवा रश्मी वहिनींवर यापुढे अशी बिनबुडाची चिखलफेक केली, तर ठाकरे पक्षाची महिला आघाडी गप्प बसणार नाही. आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून महिला आघाडीच्या ताकदीने तुम्हाला जाब विचारू,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

दिशा सालियान प्रकरणाचा आधार घेऊन लक्ष विचलित करू नका -माहेश्वरी तरे

या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाच्या पदाधिकारी माहेश्वरी तरे यांनी दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांचा प्रतिवाद केला. “दिशा सालियान मृत्यू प्रकरण 8 जून 2020 चे आहे. त्या घटनेनंतर खुद्द तिच्या वडिलांनी स्वतः व्हिडिओ क्लिप जारी करून स्पष्ट केले होते की, माझ्या मुलीच्या मृत्यूवरून कोणताही राजकीय वाद निर्माण करू नका; ती गच्चीवरून पडून मरण पावली असून तिच्यावर कोणताही अत्याचार झालेला नव्हता.”

न्यायालय आणि तपास यंत्रणांचा निर्वाळा

“दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव कोणत्याही एफआयआरमध्ये नाही. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांमध्ये स्पष्ट नमूद आहे की पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी करता येणार नाही. सीबीआय आणि पोलिसांनी ही केस तपासलेली असताना, आता सहा वर्षांनंतर कोणाच्या सांगण्यावरून राजकीय साक्षात्कार झाला आहे?”

मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्याचा डाव

“प्रदीप पूर्णेकर यांची कार्यालयात घुसून झालेली हत्या हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. त्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी दिशा सालियान प्रकरणाचा संबंध जोडणे आणि विषयांतर करणे अत्यंत हास्यास्पद आहे. ही केस पूर्णपणे वेगळी असून पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असे माहेश्वरी तरे यांनी ठणकावून सांगितले.

———————————————

हेही वाचा…

कार्यालयात घुसून गोळीबार अन् कोयत्याने सपासप वार: प्रदीप पूर्णेकर हत्याकांडात 100 CCTV फुटेज स्कॅन, पप्या शिंदेकडील गाड्या जप्त; ‘टल्ली’च्या शोधात 9 विशेष पथके

ठाण्यातील मानपाडा परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून झालेल्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण ठाणे शहर हादरले आहे. राजकीय वैमनस्यातून घडलेल्या या थरारक गुन्ह्याची उकल करण्यासाठी ठाणे पोलिसांनी प्रचंड वेगाने तपासाची चक्रे फिरवली असून, तब्बल 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी पप्या शिंदेसह तिघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून, आता मुख्य संशयितांपैकी एक असलेला संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’ याच्या शोधासाठी पोलिसांची ९ विशेष पथके दिवस-रात्र छापेमारी करत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2026. All rights reserved. Theme Rubik News by Kantipur Themes