राजकीय संघर्ष असायला हवा पण जीव घेणारा संघर्ष नसायला हवा:मंत्री गणेश नाईकांनी घेतली पूर्णेकर कुटुंबीयांची भेट




ठाण्याच्या मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. या धक्कादायक घटनेनंतर आज भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना नाईक म्हणाले की, राजकीय संघर्ष असायला हवा पण जीव घेणारा संघर्ष नसायला हवा. तसेच, खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होणार असे हे शासन असल्याचे सांगत, प्रदीप पुर्णेकर हा कोणत्या पक्षाचा होता यापेक्षा तो एक सामाजिक कार्यकर्ता होता, अशी भावनाही गणेश नाईक यांनी व्यक्त केली. गणेश नाईक म्हणाले, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवीन गोष्टी समोर येत आहेत. यामध्ये कुटुंबीयांनी देखील काही गोष्टी मांडल्या आहेत. अनेक जण अटक झाले आहेत, खोलवर तपास होईल. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होणार असे शासन असल्याचे नाईक यांनी सांगितले. पुढे बोलताना गणेश नाईक म्हणाले, राजकीय संघर्ष असायला हवा, पण जीव घेणारा संघर्ष नासायला हवा. सांत्वन म्हणजे आपण एकदा आलो म्हणजे दुःख दूर होणार नाही. यात कोण सूत्रधार असतील त्यांना कायद्याच्या कक्षेमध्ये येऊन शिक्षा होईल, असे आश्वासन नाईक यांनी दिले आहे. तसेच शेवटी सत्य कधी तरी उजेडात येतेच, वरच्या दरबारात कोणी सुटत नाही, संजय मिळेल. या घटना घडल्या यात विविध अॅंगल आहेत. या घटना वाईट आहेत. पोलिस यंत्रणेने सतर्क व्हायला हवे. हा माझा मतदारसंघ होता. शिवसेनेमध्ये असल्यापासून माझे पूर्णेकर यांच्यासोबत संबंध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *