पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी कॉमनवेल्थ विक्रम नोंदवला:पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 9 सुवर्ण आणि एक रौप्यपदकही पटकावले




विनिपेग, कॅनडा येथे नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग व बेंच प्रेस स्पर्धेत पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी विक्रमी कामगिरी करत नऊ सुवर्णपदके, एक रौप्यपदक आणि कॉमनवेल्थ विक्रमाची नोंद केली. विविध कॉमनवेल्थ देशांतील सुमारे ८०० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. ५७ किलो एम-१ महिला गटातील डॉ. इनामदार यांनी क्लासिक पॉवरलिफ्टिंगमध्ये स्क्वॅट, बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या तीन प्रकारांत एकूण ३७२.५ किलो वजन उचलले. या कामगिरीतून त्यांनी तीन सुवर्णपदके व एक रौप्यपदक मिळवले. इक्विप्ड पॉवरलिफ्टिंगमध्ये त्यांनी एकूण ४२७.५ किलो वजन उचलत नवीन कॉमनवेल्थ एकूण वजनाचा विक्रम नोंदविला. इक्विप्ड पॉवरलिफ्टिंगमध्ये भारतासाठी चार सुवर्णपदके मिळविताना त्यांनी ‘बेस्ट लिफ्टर – कॉमनवेल्थ फर्स्ट रनर-अप’ हा किताबही पटकावला. क्लासिक बेंच प्रेसमध्ये ७५ किलो आणि इक्विप्ड बेंच प्रेसमध्ये ९५ किलो वजन उचलून दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक मिळवले. त्यामुळे चारही प्रकारांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पुण्यातील सदाशिव पेठ येथे त्या खेळाडू तसेच चयापचयाशी संबंधित विकारांसाठी ‘आहार आयुर्वेद’ हे क्लिनिक चालवतात. खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांनी स्वतःच्या खेळाचा देखील सराव करत यश संपादन केले आहे. दरम्यान, पुण्याच्या मुक्ता फाटक हिने ६३ किलो खुल्या महिला गटातील क्लासिक बेंच प्रेसमध्ये ६५ किलो वजन उचलून पाचवा क्रमांक मिळवला. इक्विप्ड बेंच प्रेसमध्ये ८७.५ किलो वजन उचलत तिने कांस्यपदक पटकावले. डॉ. इनामदार व फाटक या दोघीही पुण्यातील ‘कोड ब्रेकर जिम’मध्ये सराव करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *