![]()
पुणे जिल्ह्यातील बारामती येथे आज (रविवार) एका महत्त्वपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या केंद्राचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या
.
विद्या प्रतिष्ठान या पवार कुटुंबाच्या शैक्षणिक संस्थेअंतर्गत हे केंद्र उभारण्यात आले असून, उद्घाटनाच्या वेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार उपस्थित राहणार आहे. काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्या संबंधांवर सतत टीका होत असताना, शरद पवार आणि गौतम अदानी यांचे एकत्र येणे राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानले जात आहे.
गौतम अदानींनी यापूर्वीही दिली बारामतीत भेट
दरम्यान, यापूर्वी 2022 मध्ये गौतम अदानी यांनी पत्नी प्रीती अदानी यांच्यासह बारामतीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे, आज उद्घाटन होणाऱ्या या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’साठी अदानी यांनीच निधी दिला आहे.
हे राजकारण नाही, तर समाजकारण – रोहित पवार
या भेटीवर राजकीय टीका होऊ नये यासाठी आमदार रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यातील भेटी या प्रामुख्याने सामाजिक कार्यासाठी असतात. त्यामुळे या कार्यक्रमाला केवळ राजकारणाच्या चष्म्यातून पाहणे चुकीचे आहे.”
आजच्या भारतात AI चा अर्थ ‘अदानी इन्फ्लुएन्स’
दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या सोहळ्यावर उपरोधिक टीका केली आहे. ते म्हणाले, “आजच्या भारतात AI चा अर्थ ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ नसून ‘अदानी इन्फ्लुएन्स’ (Adani Influence) असा झाला आहे.”
