अंशकालीन निदेशक संघर्ष समितीने घेतली पालकमंत्र्यांची भेट

१४ वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर सेवा; कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी

नांदेड प्रतिनिधी : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार जिल्हा परिषदेच्या १०० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांचे अध्यापन करण्यासाठी सन २०१२ पासून अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, नियुक्तीपासून तब्बल १४ वर्षे सेवा बजावूनही हे निदेशक अद्याप कायम सेवेत सामावून घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व कौशल्यांना चालना मिळत असून, शालेय शिक्षणात या विषयांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. असे असतानाही अंशकालीन निदेशकांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असून, त्यांच्या सेवा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर अंशकालीन निदेशक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. गेल्या १४ वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत असलेल्या अंशकालीन निदेशकांना कायम सेवेत सामावून घेऊन त्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष एन. एन. वाघमारे, सचिव कपिल वाघमारे, संतोष कस्तुरे, एकनाथ सोनटक्के, वैभव कुंटुरकर , जि. बि. कल्याणकर, गौस खान पठाण, बापुराव जमदाडे, मन्मथ लांडगे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *