Mumbai Sanjay Raut Slams Election Results; Same Numbers Same Machines Money Allegations | तेच आकडे, त्याच मशिन, तिच सेटिंग, तोच पैसा: संजय राऊत यांचे निकालावर भाष्य; निवडणुकीत पैशाची गारपिट झाल्याचा आरोप – Maharashtra News



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे आकडे विधानसभेसारखेच आहेत. तेच आकडे, त्याच मशिन आणि तीच सेटिंग. आकड्यांमध्ये कोणताही बदल झाला नाही. भाजपने मशिन विधानसभे

.

मुंबई महापालिकेच्या तोंडावर आज ठाकरे गट व मनसेच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले, आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. चर्चा पूर्णपणे पूर्ण झाली आहे. चर्चा व जागावाटप संपले आहे. कुणी कुठे लढायचे यावर एकमत झाले. कोणती अडचण दिसत नाही. ज्या अडचणी होत्या, त्या स्वतः राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून दूर केल्या. सर्व कार्यकर्त्यांचे समाधान होईल याची काळजी घेतली. तरीही युती काही गोष्टी या कटुतेने सोडवायच्या असतात. कार्यकर्त्यांच्या भावना व मान राखायचा असतो. त्यात आम्ही यशस्वी झालो असे आम्हाला वाटतो. आजची बैठक आमची शेवटची बैठक होती असे आम्ही मानतो. येत्या 1-2 दिवसांत यासंबंधीची रितसर घोषणा होईल.

काँग्रेसची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले आहे. आता तुम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांना केला. त्यावर ते म्हणाले, नक्कीच आमचे शेवटपर्यंत प्रयत्न करतील. काँग्रेस हा महाविकास आघाडीतील एक प्रमुख पक्ष आहे. काँग्रेसची स्वतःची एक व्होटबँक आहे. आमच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रीय पक्ष असणारा तो एकमेव पक्ष आहे. लोकसभा व विधानसभा एकत्र लढल्यामुळे आपण महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र लढावे अशी आमची व त्यांचीही इच्छा आहे. पण त्यांच्या काही अडचणी आहेत. विशेषतः राज ठाकरे यांच्या संदर्भात. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, भाजपचा पराभव करण्यासाठी आपल्याला सर्व घटक एकत्र घ्यावे लागतील.

आमची त्यांच्या दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केली. महाराष्ट्रातील त्यांच्या हायकमांडशीही संवाद साधला. त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न अजून सुरू आहेत. अजून 72 तास आहेत. पण आमच्यात कोणतीही कटूता नाही. आम्ही त्यांची अडचण समजून घेत आहोत. ते वेगळे लढत असले तरी आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करू, असे राऊत म्हणाले.

तेच आकडे, त्याच मशिन अन् तिच सेटिंग

संजय राऊत यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले. ते म्हणाले, तुम्ही विधानसभांचे निकाल पाहिले तर तेच आकडे आहेत. मशिन तशीच सेट आहे. 120-125 भाजपला करेक्ट. विधानसभेला व इथेही शिंदे गटाला 54 चा आकडा आणि 40-42 अजित पवार. आकडे तेच आहेत ना. त्याच मशिन, तीच सेटिंग आणि तोच पैसा. ही आपली लोकशाही आहे. तुम्ही आकडे पाहा ना. आकड्यांमध्ये अजिबात बदल झाला नाही. भाजपने मशिन त्याच पद्धतीने फिट केल्या. त्यामुळे तेच आकडे दिसत आहेत. त्यांनी निदान आकडे तरी बदलायला पाहिजे होते.

आम्ही निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडल्या होत्या

या निवडणुकीत पैशांची गारपिट झाली. त्या गारपिटीपुढे कोण टिकणार? आम्ही उगवलेली व पेरलेली शेतही त्यापुढे झुकली गेली. 30 कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर भाजप व शिंदे गटाने 150 कोटी रुपये खर्च करत आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीत आतापर्यंत आम्ही प्रचाराला हेलिकॉप्टर व खासगी विमाने वापरली नाही. आम्ही या निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडल्या होत्या. पण इथे स्पर्धा सत्ताधारी पक्षांतच होती. स्पर्धा आमच्याशी नव्हतीच. सत्तेतील 3 पक्ष एकमेकांविरोधात खेळत राहिले. यामुळे पैशाचा मोठा धुरळा उडाला. पैशांची गारपिट झाली. लोकांनाही सवय झाली आहे पैसे घेऊन मतदान करायची, असे संजय राऊत आपला संताप व्यक्त करताना म्हणाले.

हा विचारांचा नव्हे तर पैशांचा विजय

एकनाथ शिंदे यांनी हा विजय महायुतीचा असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत यांनी त्यावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, या निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असेल तर त्यांनी ही निवडणूक एकमेकांविरोधात का लढली? अमित शहांकडे गेलात कशाला? आम्हाला घ्या म्हणून सांगण्यासाठी. त्यानंतरही नगरपालिकांमध्ये तुम्ही एकमेकांविरोधात लढलात. नगरपालिकांत कुठे महायुती होती. कुणाचीच युती नव्हती. कुणाचीच आघाडी नव्हती. नगरपालिकेत चपराक वगैरे काही नसते. सत्तेचा खेळ असतो. माणसांची फोडाफोडी असते. आता निवडून आलेले नगराध्यक्षही फोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

श्रीवर्धनमध्ये आमचा नगराध्यक्ष निवडून आला. पण लगेच पैशाच्या जोरावर त्याला फोडण्याचे प्रयत्न सुरू झालेत. हा विचारांचा नव्हे तर पैशांचा विजय आहे. हा सत्तेच्या दहशतीचा विजय आहे. हे फार काळ चालणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *