‘6 वर्षे येरवड्यात राहून मराठी आली नाही’ म्हणणारा संजूबाबा बॅकफूटवर:ट्रोल होताच संजय दत्तचा सरनाईकांना फोन; ‘जय महाराष्ट्र’ म्हणत व्यक्त केली दिलगिरी

[ads1]

  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sanju Baba, Who Said ‘I Did Not Learn Marathi After Living In Yerwada For 6 Years’, Is On The Back Foot, Sanjay Dutt Calls Sarnaik As Soon As He Is Trolled; Expresses Regret By Saying ‘Jai Maharashtra’

मुंबई20 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘प्रतापभाई, मी ६ वर्षे येरवडा तुरुंगात राहूनसुद्धा मला मराठी शिकता आली नाही,’ असे जाहीर मंचावरून सांगणारा अभिनेता संजय दत्त अखेर ट्रोलिंगनंतर बॅकफूटवर आला आहे. “प्रतापभाई, जय महाराष्ट्र! मी तर मस्करी करत होतो, मला चांगली मराठी येते,” असा थेट फोन करून संजूदत्तने सरनाईक यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली.

दहीहंडी उत्सवात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत संजय दत्तने हे विधान केले होते. रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी सक्तीची मोहीम राबवणाऱ्या सरनाईकांच्या मंचावरच एका बड्या अभिनेत्याने उडवलेली ही खिल्ली नेटकऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. ‘नियम फक्त गरीब रिक्षाचालकांसाठीच का, सेलिब्रिटींना सूट कशासाठी?’ असा संताप अनेकांनी व्यक्त केला होता.

स्व.बाळासाहेब आमच्या पाठीशी उभे राहिले होते

“आमचे कुटुंब कट्टर मुंबईकर आहे. मी याच मातीत वाढलो आणि महाराष्ट्राने मला भरभरून प्रेम दिले आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. संकटाच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते,’ अशी आठवणही त्याने या वेळी काढली.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *