Mumbai Rohit Pawar Sunil Tatkare Clash; Ladki Bahin Yojana Sparks Credit War in MahaYuti | रोहित पवार अत्यंत बालिश आमदार: सुनील तटकरे यांचा आरोप; लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीची म्हणत शिंदे गटाला हाणला टोला – Mumbai News

Advertisements
Advertisements

Advertisements


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. रोहित पवार हे अत्यंत बालिश नेते अ

Advertisements

.

रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधताना अजित पवाराचा पक्ष कोकणातील एका नेत्याने ताब्यात घेतल्याचा आरोप केला होता. अजित पवारांच्या पक्षात सर्वजण एका विचाराचे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता अजित पवारांच्याच हातात पक्ष राहिला नाही. दादांनी एका कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणवर निलंबनाची कारवाई केली होती. पण त्यानंतर एका नेत्याने त्याला बढती दिली. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस कोकणातील एका नेत्याने ताब्यात घेतल्याचे चित्र आहे, असे ते म्हणाले होते.

सुनील तटकरे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. रोहित पवार यांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेत नाही. त्यांनी आपले घर (पक्ष) पेटलेले आहे की, शांत आहे हे त्यांनी पहावे. त्यांनी त्याची अवस्था पहावी. त्यातील अंतर्गत कुरघोड्या पहाव्या. त्यानंतर इतर राजकीय पक्षांवर टीका करण्याचा अधिकार आहे. अजून तुम्ही खूप बालिश आहे, असे ते म्हणाले.

लाडकी बहीण योजना अजित पवारांची

तत्पूर्वी, एका कार्यक्रमात बोलताना तटकरेंनी लाडकी बहीण योजना ही राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचा दावा करत एकप्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला टोला हाणला होता. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यामुळेच राज्यात महायुतीच्या 238 जागा आल्या. ही योजना फसवी असल्याचा दावा विरोधक करतात. महिलांचा स्वाभिमान दीड हजार रुपयांत विकत घेण्यात आल्याचा आरोपही या प्रकरणी केला जातो. पण जी व्यक्ती तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली तिला ही योजना कशी काय समजणार? असे ते म्हणाले होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंमुळेच महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता सुनील तटकरे यांनी असाच दावा केल्यामुळे या योजनेचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांत चढाओढ लागल्याचे चित्र आहे.

काय म्हणाले होते उदय सामंत?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात वेगवेगळ्या योजना आणल्या. या योजनांमुळे महाराष्ट्रात एक सकारात्मक वातावरण तयार झाले. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. हे कुणीच नाकारू शकत नाही. यात भाजपला डिवचण्याचे किंवा वाद निर्माण करण्याचे कोणतेही कारण नाही. माझ्या वक्तव्यात कोणताही विपर्यास करणारा शब्द नाही किंवा मी श्रेय लाटण्यासाठीही बोलत नाही, असे मंत्री उदय सामंत म्हणाले होते.

हे ही वाचा…

अजित पवारांचा NCP वर ताबा राहिला नाही:आमदार रोहित पवार यांचा दावा; सत्ताधारी राष्ट्रवादीत भाजपचा व्हायरस शिरल्याचा आरोप

मुंबई – ​​​​​​राजकारणातील सत्ता संघर्षावर घणाघात करत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी भाजपवर आरोप केला की, भाजपचा व्हायरस आमच्या पक्षात शिरला आहे आणि त्यामुळेच पक्षात दुही निर्माण झाली आहे. अजित पवार यांचे पक्षावर नियंत्रण राहिले नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. रोहित पवार यांनी भाजपची रणनीतीच फोडा आणि राजकारण करा अशी असल्याचा आरोप करत, मराठी-अमराठी, हिंदू-मुस्लीम, ओबीसी- मराठा अशा वादांमध्ये जनतेला अडकवण्याचा डाव असल्याचे सांगितले. वाचा सविस्तर

Advertisements
Advertisements
  • Related Posts

    MSEDCL Ganesh Mandal Power Connection Domestic Rates | महावितरणची गणेश मंडळांना भेट: तात्पुरत्या वीज जोडणीसाठी घरगुती दर, सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन – Hingoli News

    सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध् केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी अधिकृत वीजपुरवठा घेऊनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन…

    Raj Thackeray Meets CM Fadnavis at ‘Varsha’ Following BEST Poll Rout | बेस्ट पराभवानंतर राज ठाकरे ‘वर्षा’वर: सीएम फडणवीस यांची घेतली अचानक भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण – Mumbai News

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *