
एका १७ वर्षीय मुलीकडे मागील दाेन महिन्यापासून शरीर सुखाची मागणी एका तरुणाने केली. परंतु मुलीने त्यास नकार दिल्याने त्याकारणाने ओेळखी मधील तरुणाने तिला मारहाण करुन मानसिक त्रास दिल्याने संबंधित मुलीस आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघ
.
याप्रकरणी पिडित मुलीच्या ४१ वर्षीय आईने आराेपी विराेधात येरवडा पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आयुष शिंदे (वय- २५,रा. चिखलवाडी, खडकी,पुणे) या आराेपीवर भान्यास कलम १०८, ७५ (२), ११५ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पिडित मुलगी व आराेपी हे एकमेकांचे ओळखीचे आहे. परंतु आराेपी आयुष शिंदे हा मुलीस मागील दाेन महिन्यापासून सातत्याने शरीरसुखाची मागणी करत हाेता. परंतु त्या गाेष्टीकरिता मुलीने त्यास नकार दिला हाेता. या गाेष्टीचा राग आल्याने तरुणाने तिला मारहाण देखील केली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या मुलीस मानसिक त्रास हाेऊन तिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याने आराेपी विराेधात पाेलीसांनी गुन्हा दाकल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक एस लामखडे करत आहे.
अश्लील वर्तवणूक प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल
तरुणीला वारंवार कॅबिनमध्ये बोलवून व कंपनीच्या कार्यक्रमामध्ये बोलवून वाईट नजरेने मिठी मारून, अश्लील हावभाव करून, डोळ्याने खुना करून तिला वारंवार मिठी मारून अश्लिल चाळे केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक प्रकाशचंद्र सुराणा (५०, रा. इसाडोरा अपार्टमेंट, पुष्पक पार्क, मुसळेरोड, औंध, पुणे) याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३४ वषीृय तरूणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.