पैठणमध्ये 16,972 घरकुल लाभार्थींना 5 ब्रास मोफत वाळू:पहिल्या टप्प्यामध्ये 10 हजार 129 जणांना मोफत वाळूचे वाटप तहसील प्रशासनाकडून सुरू
![]()
सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शासन स्तरावर विविध आवास योजना राबविल्या जातात. मात्र, महागाईच्या काळात घरकुल बांधणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. विशेषतः वाळूचे गगनाला भिडलेले दर पाहता घरकुलाचे काम पूर्ण करताना
.
तालुक्यात एकूण १६ हजार ९७२ घरकुले मंजूर असून, पहिल्या टप्प्यात १० हजार १२९ लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती वैशाली बोंबले यांनी दिली.
सध्या बाजारपेठेत पाच ब्रास वाळूसाठी लाभार्थ्यांना किमान ३० हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत होता. घरकुलासाठी मिळणारे १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान पाहता, हा खर्च पेलणे गरिबांना अशक्य होते. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी बांधकामे थांबवली होती. काही जण नाइलाजास्तव ‘क्रश सँड’चा वापर करत होते. ही अडचण लक्षात घेऊन आमदार विलास भुमरे यांनी तहसीलदार ज्योती पवार यांना सूचना दिल्या. आवश्यक वाळूसाठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे प्रशासनाने सांगितले.
लाभार्थींना मिळणार थेट लाभ लाभार्थींची यादी तयार करून तहसील प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मागील तीन दिवसांत बाबासाहेब महालकर (पाचलगाव), राम शिंदे, दत्तात्रय केसकर (पिंपळवाडी), विष्णू चांदणे (हर्षी) यांच्यासह ४० हून अधिक लाभार्थींना वाळू उपलब्ध क रून दिल्याची माहिती बीडीओ मनोरमा गायकवाड यांनी दिली.
पहिली अंमलबजावणी पैठणमधून सुरू ^राज्य सरकारने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळु देण्याचा निर्णय घेतला आहे. याची पहिली अंमलबजावणी पैठणमधून सुरू झाली आहे. यामुळे गरिबांच्या घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे. याचा फायदा घरकुल लाभार्थ्यांनी घ्यावा. – विलास भुमरे, आमदार पैठण
अर्ज केल्यानंतर तातडीने रेती वाटपाची प्रक्रिया पैठण तालुक्यात १६ हजार ९७२ घरकुले मंजूर असून, पहिल्या टप्प्यात १० हजार १२९ लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप सुरू करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर तातडीने रेती वाटपाची प्रक्रिया केली जात आहे. प्रशासकीय स्तरावर याचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती वैशाली बोंबले यांनी लाभार्थ्यांना केले आहे. दरम्यान, वाळू मिळत असल्याने बंद कामे सुरू होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
