चिखलदरा येथे भाजपचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर:पदाधिकाऱ्यांना संघटन बळकटीसाठी मार्गदर्शन

0
f4ec1b43-9140-495c-89ee-788ff154c9d8_1779809622528.jpg




भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत चिखलदरा येथे दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाची वैचारिक वीण घट्ट करण्यासाठी आणि संघटन अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये भाजपच्या अमरावती महानगरचे पदाधिकारी सहभागी झाले होते. चिखलदरा येथील विआरके रिसॉर्ट येथे आयोजित या शिबिरात सक्षम कार्यकर्ते घडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे वैचारिक अधिष्ठान, कार्यपद्धती, सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर आणि देशासमोरील आव्हाने यांसारख्या विषयांवर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. काटेकोर नियोजन आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची फळी ही भाजपची सुरुवातीपासूनच एक महत्त्वाची बाजू राहिली आहे. या शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा विकास घडवून त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात गृहराज्यमंत्री पंकज भोयर, आमदार चित्रा वाघ, भाजप प्रदेश उपाध्यक्ष उपेंद्र कोठीकर यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed