ezgifcom-animated-gif-maker-9_1779608632.gif



पुण्यातील अत्याधुनिक आणि वेगवान सार्वजनिक वाहतुकीचा कणा समजल्या जाणाऱ्या पुणे मेट्रोमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाहेर पाऊस पडत असताना चक्क मेट्रोच्या कोचमध्येही पाण्याच्या धारा पडू लागल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. या घटनेचा

.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२१ मे) सायंकाळी पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यावेळी पिंपरी-स्वारगेट पर्पल लाईनवरून धावणाऱ्या एका मेट्रो कोचमध्ये अचानक छतातून पाणी गळू लागले. टपकणाऱ्या पाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रवासी इकडे-तिकडे सरकताना दिसले, मात्र अनेक प्रवाशांना या गळतीमुळे भिजावे व्हावे लागले.

डब्यात बसलेल्या काही प्रवाशांनी हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या आधुनिक सुविधेची पहिल्याच मोठ्या पावसात अशी दैना उडाल्याने मेट्रोच्या बांधकाम आणि देखभालीच्या दर्जावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रशासनाचे तांत्रिक बिघाडाचे स्पष्टीकरण

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर आणि चौफेर टीका झाल्यानंतर पुणे मेट्रो प्रशासनाने तातडीने यावर आपली बाजू मांडली आहे. पुणे मेट्रोचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबवेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ही घटना २१ मे रोजी संध्याकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास ‘ट्रेन सेट-५’ मध्ये घडली. पावसाचे पाणी थेट छतातून आत आलेले नाही, तर मेट्रोमधील वातानुकूलित यंत्रणेशी (AC) संबंधित असलेल्या ‘HVAC’चा ड्रेन पाईप चोकअप (ब्लॉक) झाला होता. हा पाईप ब्लॉक झाल्यामुळे एसीचे पाणी ओव्हरफ्लो होऊन थेट कोचच्या आत गळू लागले. हा बिघाड तातडीने दुरुस्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवाशांमध्ये संताप

पुणे मेट्रोला सुरू होऊन अद्याप फार काळ लोटलेला नाही. असे असताना पहिल्या काही पावसांतच जर मेट्रोची ही अवस्था होत असेल, तर पावसाळ्यात प्रवाशांनी प्रवास कसा करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाची ही दुरवस्था पाहून नेटकऱ्यांनीही सोशल मीडियावर प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed