विधान परिषद निवडणूक:जळगावची जागा शिवसेनेला द्या, चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी गुलाबराव पाटलांची मागणी

0
new-project-2026-05-24t112255855_1779602043.jpg




प्रताप पाटील आणि सुमित हे दोघे जण आमच्या पक्षात इच्छूक आहेत. पण सुमितचे वय कमी असल्याने प्रताप पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागितली, असे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. माझ्या मुलाला जर उमेदवारी मिळाली तर महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही ही जागा जिकंणार असा विश्वास सुद्धा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र यावर निर्णय हा वरच्या स्तरावर होणार आहे. महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल. विधान परिषदेच्या 7 जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी आम्ही केली आहे. आता ज्येष्ठ नेते काय निर्णय घेतात ते पहावे लागेल. योग्य निर्णय होईल. ..विधान परिषदेसाठी दोघांनाही एकमेकांची गरज गुलाबराव पाटील म्हणाले की, विधान परिषदेच्या जागेबद्दल अजून निर्णय झालेला नाही. जर आमच्या पक्षाला जागा सुटली तरी आम्हाला भाजपची गरज आहे आणि जागा भाजपला सुटली तरी भाजपला आमची गरज आहे. त्यामुळे उमेदवार देतानासुद्धा वरीष्ठ नेत्यांच्या सुचनेनुसार उमेदवार देऊ. महायुतीचा उमेदवार कसा विजयी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. शेवटी जर नशीबात असेल तरच पद मिळत असते. जागा मिळावी ही मागणी आम्ही केलेली आहे. महायुती सर्वात मोठी म्हणून आम्ही काम करत असतो. आम्ही अर्ज भरू पण महायुतीचे नेते जे फायनल करतील तोच निर्णय अंतिम राहील. यापूर्वी दोनदा जागा शिवसेनेने जिंकली गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव विधान परिषदेची निवडणुकीत आतापर्यंत आम्ही भाजपला खांद्याला खांदा लावून सहकार्य केले आहे. यापूर्वी दोन वेळा शिवसेनेने ही जागा लढवून ती जिंकली देखील आहे. नंतरच्या काळात ही जागा भाजपकडे गेली होती. त्यामुळे यंदा ही जागा पुन्हा शिवसेनेला मिळावी. ठाकरे गटाच्या खासदारांसंदर्भातील ऑपरेशन टायगरबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. शेवटी ते एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते कधी काय करतील याबद्दल कोणीच आधी काही सांगू शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed