स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर; तब्बल 7 वर्षे धूळखात पडलेली रोड स्विपर मशीन सुरू, रस्ते धूळमुक्तीचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्नचालू‎

0
250_17793787826a0f2a5e6502f_46485461795.jpg



तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जाहीरनाम्यात शहरातील रस्ते धुळमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याच्या आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाची पूर्तता करण्याकडे पाऊल टाकण्यात आले आहे. यासाठी गेल्या ७ वर्षांपासून बंद अवस्थेत धूळखात पडून असलेली नगरपरिषदेची रोड स्विपर मशीन

.

गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरातील नागरिक आणि बाहेरून येणारे भाविक, प्रवासी रस्त्यांवरील उडणाऱ्या धुळीमुळे प्रचंड हैराण झाले होते. नागरिकांच्या या त्रासाची दखल घेऊन शहर अधिक स्वच्छ आणि धुळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून ही आधुनिक यंत्रणा पूर्ववत करण्यात आली आहे. या मशीनमुळे शहरातील रस्ते चकाचक होण्यास मोठी मदत होणार असून रस्त्यांवरील धूळ, कचरा आणि घाण साफ करण्यासाठी हे यंत्र प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या प्रसंगी नगरसेवक सर्वश्री सुधीर धोत्रे, संजय बंदपट्टे, आदित्य फत्तेपूरकर, किरण घाडगे, प्रसाद कळसे, अक्षय गंगेकर, लोकेश यादव, विनायक देवमारे यांच्यासह नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ^स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर ही संकल्पना केवळ कागदावर न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यास प्राधान्य दिले जात आहे.यामुळे शहराच्या स्वच्छता मोहिमेला आता अधिक गती मिळणार आहे. प्रणिता भालके, नगराध्यक्ष, पंढरपूर

सुविधा देण्यास प्राधान्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed