मोबाइलला दूर ठेवत बालदोस्त “हसत खेळत’ रमले रंगमंचावर:अंगिक अभिनय, संवादफेकीचे गिरवले धडे;शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
उन्हाळी सुट्टीचे औचित्य साधून मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांची रंगमंचीय भीती दूर करण्यासाठी बालरंगभूमी परिषद अहिल्यानगर शाखेतर्फे “हसत-खेळत बालनाट्य’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी जिल्ह्यासह पुण्यातूनही बालकलाकारांनी
.
१२ दिवस चाललेल्या या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मुलांना अतिशय सोप्या पद्धतीने अभिनयाचे प्राथमिक धडे दिले. “केवळ अभिनयच नाही, तर मुलांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा आणि त्यांच्या मनात नाट्यकलेप्रती ओढ निर्माण व्हावी, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे,” असे परिषदेचे अध्यक्ष प्रसाद भणगे यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक-अभिनेते पूर्णानंद वांढेकर यांनी सहभागी कलाकारांच्या पालकांचे विशेष कौतुक केले. या समारंभाला कार्यवाह सतीश लोटके, कार्यकारिणी सदस्य अनंत जोशी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी संयोजक सपना साळुंके यांच्यासह श्रीया देशमुख, टीना इंगळे, सोनाली दरेकर, विराज अडगटला, देवीप्रसाद सोहोनी, तेजा पाठक, नाना मोरे, प्रशांत सूर्यवंशी आणि अविनाश बोधले यांनी यावेळी विशेष परिश्रम घेतले.
मुलांनीच घडवली “चेटकिणीची छडी’ शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी स्वतः सुचवलेल्या विषयावर, स्वतःच लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या आणि सादरीकरण केलेल्या “चेटकिणीची छडी” या बालनाट्याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. ज्येष्ठ अभिनेते श्रेणिक शिंगवी यांनी बालदोस्तांच्या या कल्पकतेची प्रशंसा केली. प्रशिक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी सतीश लोटके, अभिनेते संकेत खेडकर, सृज्ञ टोंपे, चित्रकार सुजाता पायमोडे, नृत्यदिग्दर्शक सागर अलचेट्टी आणि दिग्दर्शक शैलेश देशमुख यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कुमारी वेदिका हिने अनुभव व्यक्त करताना, “हे शिबिर कायम आठवणीत राहील आणि येथे अनेक नवीन मित्र जोडले गेले,” अशा भावना व्यक्त केल्या.
