BMC Strict Action Marathi Signboards

0
sayali-web-2026-05-17T192314.239.webp.webp


BMC Strict Action Marathi Signboards | मुंबई (Mumbai) मध्ये दुकानांवर मराठी देवनागरी (Devanagari) नामफलक लावण्याच्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिका (Municipal Corporation) आता अधिक आक्रमक झाली आहे. शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या आग्रही भूमिकेनंतर विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, तीन दिवसांत ९ हजारांहून अधिक आस्थापनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नोटीस बजावण्यात आली आहे.

तीन दिवसांत ९,३०६ आस्थापनांची तपासणी

मराठी पाट्यांचा मुद्दा गेल्या काही वर्षांत शांत झाला होता, मात्र अलीकडे तो पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईतील सर्व दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत ठळक नामफलक असणे बंधनकारक आहे. तरीही अनेक ठिकाणी हा नियम पाळला जात नसल्याची तक्रार समोर आल्यानंतर पालिकेने मोहीम सुरू केली.

१४ ते १६ मे दरम्यान महानगरपालिकेच्या ए (A), पी दक्षिण (P South) आणि बी (B) विभागांमध्ये तपासणी करण्यात आली. या काळात एकूण ९,३०६ आस्थापनांची पाहणी झाली. त्यापैकी २९६ आस्थापनांनी मराठी नामफलक न लावल्याचे आढळून आले, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम (Maharashtra Shops and Establishments Act) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली.

नियम मोडल्यास न्यायालयीन कारवाई आणि दंड

१४ मे रोजी ए विभागात ३,४५५ आस्थापनांची तपासणी झाली, त्यापैकी ११३ जणांना नोटीस देण्यात आली. १५ मे रोजी पी दक्षिण विभागात २,८६८ तपासण्यांमधून ९२ उल्लंघने आढळली, तर १६ मे रोजी बी विभागात २,९८३ तपासणीत ९१ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमातील नियम ३५ आणि कलम ३६-क नुसार, मराठी नामफलक न लावणाऱ्यांवर प्रथम नोटीस दिली जाते. त्यानंतरही नियमांचे पालन न केल्यास न्यायालयीन कारवाई होऊ शकते. या प्रकरणात संबंधित आस्थापनातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार २ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तडजोडीने प्रकरण निकाली काढायचे असल्यास संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

News Title : BMC Strict Action Marathi Signboards Maharashtra Shops Act

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed