जनगणना कार्यक्रमातून गैरहजर राहिल्याने सात शिक्षकांवर गुन्हा:फुरसुंगी पोलिस ठाण्यात कर अधिकाऱ्याने केली तक्रार दाखल

0
c9db35c4-8365-4416-92da-68d18124d14d_1778850107197.jpg




केंद्र सरकारच्या जनगणना २०२७ कार्यक्रमासाठी आयोजित प्रशिक्षण सत्राला गैरहजर राहिल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील सात शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुरसुंगी पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. फुरसुंगी नगरपरिषदेचे कर अधिकारी आबासाहेब दादासाहेब मुढे (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, एका शाळेतील सात शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनगणना २०२७ च्या कार्यक्रमासाठी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील कर्मचारी तसेच ‘आशा वर्कर’ यांची प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या कार्यक्रमांतर्गत २३ ते २५ एप्रिल दरम्यान उरळी देवाची नगरपरिषद कार्यालयात जनगणना प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. फुरसुंगी येथील वॉलनेट स्कूलमधील शिक्षकांसह सात जणांना या प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, संबंधित शिक्षक आणि कर्मचारी पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहिले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. ढावरे करत आहेत. पादचारी शिक्षिकेचे मगळसूूत्र हिसकावले पादचारी शिक्षिकेचे दीड लाखांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शिक्षिकेने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिक्षिका आंबेगावमधील दत्तनगर परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. शिक्षिकेने आरडाओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दत्तनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक एन शिंदे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed