नाशिक काॅर्पोरेट जिहाद:निदा खानच्या सहा नातेवाइकांची एसआयटीकडून चौकशी, एसआयटी ॲक्शन मोडवर, सोमवारी होणार पहिले 900 पानांचे चार्जशीट

0
orig_new-project-2026-05-15t063924827_1778807414.jpg




कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात निदा खानच्या ६ नातेवाइकांची गुन्हे शाखेच्या कार्यालयात दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात १ आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात ८ गुन्ह्याचा तपास जवळपास पुर्ण झाला असून गुरुवारी शहरातील विविध भागातील शॉपिंग मॉल, मिठाई दुकान, पेट्रोल पंप आणि एका दुकानदारास नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणातील पहिले सुमारे ९०० पानांचे चार्जशीट सोमवारी दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यात खळबळ उडवून देणारे कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहचला आहे. एसआयटीने मुख्य संशयित निदा खान हिच्या नातेवाईकांना चौकशी करीता गुन्हे शाखेच्या कार्यालयात पाचारण केले होते. तपासामध्ये आल्या काही धक्कादायक बाबी समोर तपासातील मुद्दे एसआयटीच्या तपासात काही धक्कादायक बाबी समोर येत आहे. संशयितांनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या कार मध्ये पेट्रोल कुठे भरले, कोणत्या मॉलमध्ये खरेदी केली. आणि कुठल्या दुकानात साहित्य घेतले याचा शोध घेतला. सीसी टिव्ही फुटेज तपासणी सुुरु केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *