भरधाव क्रुझरची दुचाकीस धडक; एकजण जागीच ठार:पैठणच्या इसारवाडी परिसरात घडला अपघात‎

0
orig_new-project-2026-05-13t072946250_1778637635.jpg




छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावरील ईसारवाडी शिवारातील एचपी पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगाने येणाऱ्या क्रुझर वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (१२ मे) सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. विष्णू अण्णा बोबडे (६२, रा. वाहेगाव ता. पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू बोबडे हे त्यांच्या दुचाकी (एमएच २० २४२) वरून पेट्रोल भरण्यासाठी ईसारवाडी शिवारातील एचपी पेट्रोलपंपावर आले होते. पेट्रोल भरून ते घरी परत जात असताना पैठणकडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझर वाहनाने (एमएच १६ एबी १८५७) त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात विष्णू बोबडे यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी तत्काळ एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यास माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, विष्णू बोबडे यांना रुग्णवाहिकेतून पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. एमआयडीसी ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून तपास सपोनि ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विष्णू बोबडे पेट्रोल भरून निघाले होते घराकडे विष्णू बोबडे हे दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी ईसारवाडी एचपी पेट्रोलपंपावर आले होते. पेट्रोल भरून ते घरी परत जात असताना पैठणकडून संभाजीनगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझर वाहनाने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. यात विष्णू बोबडे यांचा जागीच मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed