पावला पावलांवर लपलेला इथं वासनांध साप आहे:बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे; राजकुमार नायकांची कवितेद्वारे व्यथा

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-08t16_1778238155.png




दबा धरून बसलेली गिधाडे, कुठपर्यंत विश्‍वास ठेवायचा, नुसते मोर्चे काढून कुठपर्यंत दिवा लावायचा, पावला पावलावर लपलेला इथं वासनांध साप आहे, बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे, या कवितेतून सवना (जि.हिंगोली) येथील कवी राजकुमार नायक यांनी सध्याच्या परिस्थितीची भीषणता मांडली आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी आता बंदुकीचे लायसन मुलींच्या वडिलांना दिले पाहिजे, अशी मागणीही या कवितेतून करण्यात आली आहे. त्यांची ही कविता समाज माध्यमातून प्रचंड व्हायरल होऊ लागली आहे. राज्यात सध्या चिमुकलीवर होणारे अत्याचार अन त्यांच्या खूनाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. कोवळ्या व निष्पाप जिवांना चॉकलेच व इतर अमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार झाल्याच्या काही घटना मागील पंधरवाड्यात घडल्या आहेत. त्यामुळे आता चिमुकले जीव देखील सुरक्षीत नसल्याचे समोर येऊ लागले आहे. राज्यातीच या परिस्थितीवर सवना येथील कवी राजकुमार नायक यांनी कवितेच्या माध्यमातून भाष्य केले आहे. कवी राजकुमार नायक आपल्या कवितेत म्हणतात, काळजात नुसती व्याकुळता अन मनाला लागलेली धाप आहे, बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे. दबा धरून बसलेली गिधाडे, कुठपर्यंत विश्‍वास ठेवायचा, नुसते मोर्चे काढून कुठपर्यंत दिवा लावायचा, पावला पावलावर लपलेला इथे वासनांध साप आहे, मला बी बंदुकीचे लायसन द्या मी पोरीचा बाप आहे मेणबत्ती पेटवून साहेब कुठवर श्रध्दांजली वाहाचयी, इवल्या इवल्या चिण्यांचे मरण उघड्या डोळ्यांनी पहायचे, ऐका साहेब पोरीच्या बापाचा काळजातून अलाप आहे, बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे, काय व्हायचे ते होऊद्या आता सापाला ठेचलेच पाहिजे, धमण्याती गरम रक्त काळजापर्यंत पोहोचले पाहिजे, लेकीकडे पाहायची मग कुणाची टाप आहे, बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे. या कवितेतून मुलींच्या बापांची व्यथा मांडण्यात आली असून आता थेट शासनाने मुलींच्या वडिलांना बंदुकीचे लायसन देण्याचीच परवानगी मागितली आहे. सध्या समाज माध्यमावर कवी नायक यांनी कविता प्रचंड व्हायरल होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed