पुण्यात गुन्हेगारीचा थरार:दारूच्या नशेत मित्राचा डोक्यात दगड घालून खून, पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात, घोरपडीतील घटना
![]()
पुण्यात दारू पिताना झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना घोरपडीतील बी. टी. कवडे रस्ता परिसरातील मोकळ्या जागेत घडली. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव लोकेश मानसिंग ठोंबरे (वय 30, रा. खाडेगाव, जि. नागपूर) असे आहे. पोलिस शिपाई प्रदीप पांडे यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून मैथ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला तसेच सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून आरोपी विरोधात पुरावे देखील गोळा करण्याचे काम केले आहे. सहायक पोलिस निरीक्षक एन. पिंगुवाले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंढव्यातील एबीसी फार्म चौकात घडली. या प्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. स्वप्नील संतोष कदम (वय 22, रा. हिंगणे मळा, हडपसर) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुाचकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष मारुती कदम (वय 47) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार स्वप्नील हा मुंढव्यातील एबीसी फार्म चौकातून निघाला होता. त्या वेळी भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार स्वप्नील याला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीलचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक एस पोमण पुढील तपास करत आहेत.
