अक्कलकोटमध्ये स्वामीनामाचा गजर लिखित नामजप ग्रंथांची निघाली दिंडी:विश्वशांतीसाठी प्रार्थना, राज्यभरातून आलेल्या ग्रंथांचे स्वामी चरणी अर्पण‎

0
250_177815235069fc739e02bd5_56612972332.jpg



श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन ते पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून अक्कलकोट नगरीत ‘ओम श्री स्वामी समर्थ’ नामाचा महाघोष ऐकायला मिळाला. समर्थ नगरी परिवाराच्या वतीने राज्यभर राबवण्यात आलेल्या लिखित नामजप सोहळ्यातील ग्रंथांची बुधवारी भव्य दिंडी मिरव

.

बुधवारी सायंकाळी ५ वाजता श्री खंडोबा मंदिर येथे या सोहळ्याला प्रारंभ झाला. सुधाकर महाराज इंगळे, सैदप्पा इंगळे, वनिताताई झेंडे व वीणाताई कामठे यांच्या उपस्थितीत गुरव पुजारी यांनी ग्रंथांचे विधिवत पूजन केले. येथून निघालेली ही दिंडी शहराच्या मुख्य रस्त्यावरून ओम श्री स्वामी समर्थ अशा नामजपाच्या गजरात मार्गस्थ झाली.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गणेश पाठक, कुमार पतंगे, सुभाष तारापुरे, राहुल होटकर, सुखदा ग्रामोपाध्ये, कावेरी धरणे, अश्विनी शिंपी, सुवर्णा इंगळे, श्रीपाद इंगळे, प्रसाद इंगळे, अनघा इंगळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. विश्वशांती आणि प्रत्येकाच्या मनात शांतता नांदावी, यासाठी समर्थ नगरी परिवाराने हा लिखित नामजप यज्ञ केला आहे. स्वामींच्या चरणी ही सेवा अर्पण करताना भाविकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते.

असा रंगला समाधी मठात नामजप सोहळा समाधी मठात पूजन: दिंडी श्री स्वामी समर्थ समाधी मठात पोहोचल्यानंतर वे. शा. सं. अण्णू महाराज यांनी ग्रंथांचे पूजन करून ही सेवा स्वामी चरणी अर्पण केली. वटवृक्ष देवस्थान येथे स्वागत: मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे आणि अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी पालखीचे स्वागत करून ग्रंथ स्वामींच्या चरणी अर्पण केले. या सोहळ्यात अक्कलकोटसह पुणे, मिरज, नळदुर्ग आणि परिसरातील हजारो भक्त सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *