नंदनशिवणीतील मंदिरात धाडसी चोरी; ३ लाख ६३ हाजारांचा ऐवज लंपास

नांदेड

[ads1]

कंधार (प्रतिनिधी) :- नंदनशिवणी तालुक्यातील कंधार येथील हनुमान मंदिर आणि विठ्ठल-रुक्माई मंदिरात चोरट्यांनी धाडसी चोरी करून ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मूर्तीवरील सोन्याचे दागिने तसेच दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेली.

३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर मूर्तीवरील सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.

या प्रकरणी ईश्वर गणपती देवकते यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


Post Views: 246






[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *