वसमतमधून अल्पवयीन मुलास फुस लाऊन पळविले:वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; मुलाच्या शोधासाठी स्वतंत्र पथक स्थापन

0
730-x-548-new-2026-04-27t090857240_1777261105.jpg




वसमत येथून अल्पवयीन मुलास फुस लाऊन पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात रविवारी ता. २६ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्या मुलाच्या शोधासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील रहिवासी असलेले जवान केंद्रीय राज्य राखीव दलात हवालदार पदावर कार्यरत आहेत. मागील काही दिवसांपुर्वी ते एक महिन्याची सुट्टी घेऊन कुटुंबासह वसमत येथे आले होते. गुरुवारी ता. २३ त्यांचा मुलगा बाहेरून नाश्‍ता करून येतो असे सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर बराच वेळ तो घरी परतला नाही. मात्र तो मित्राकडे गेला असेल असे गृहीत धरून त्यांच्या कुटुंबियांनी दुर्लक्ष केले. मात्र सायंकाळी उशीरापर्यंत तो घरी आला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरु केली. वसमत तालुक्यासह बाहेर जिल्हयात राहणाऱ्या नातेवाईकांकडे त्याची चौकशी केली मात्र तो नातेवाईकांकडेही गेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी ता. २६ वसमत शहर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडारे, जमादार शेख नय्यर यांच्या पथकाने शोध मोहिम सुरु केली आहे. त्यासाठी वसमत शहरातील मुख्य बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून त्याचे अखेरचे लोकेशन कुठे आहे याची माहिती घेतली जात आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडारे पुढील तपास करीत आहेत. त्या मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed