
हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासापासून सर्वदूर पाऊस सुरु असून सेनगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे भंडारी गावाजवळील नाल्याला पुर आला आहे. या पुरामुळे पाच गावांचा संपर्क तुटला असून शालेय विद्यार्थीनी सुमारे चार तास अडकून पडल्या होत्या. शनिवारी ता. २६ दिव
.
हिंगोली जिल्ह्यात मागील चोविस तासांपासून सर्वदूर हलका ते मध्यमस्वरुपाचा पाऊस सुुरु आहे. या पावसामुळे नदी, नाले भरून वाहू लागले असून पावसाळ्यात नदीपात्र भरण्याची हि केवळ दुसरी वेळ आहे. या पावसामुळे पिकांना मोठा फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान, सेनगाव तालुक्यातील भंडारी व परिसरात मोठा पाऊस झाला आहे. या पावसामुळे भंडारी गावाजवळ असलेल्या नाल्याला पुर आला असून पुराचे पाणी नाल्यावरून वाहू लागले आहे. त्यामुळे भंडारी, खैरी, होलगिरा, बोरखेडीतांडा, बोरखेडी या गावांचा संपर्क तुटला आहे. या पुरामुळे बोरखेडीतांडा भागातून धावणारी मानव विकास मिशनची बस अडकून पडली असून त्यामुळे सुमारे ४० पेक्षा अधिक विद्यार्थीनी दुपारी बारा वाजल्या पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अडकुन पडल्या होत्या. सायंकाळी पाच वाजल्यानंतर पुराचे पाणी कमी झाल्याने बस पुढे मार्गस्थ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी उशीरा पर्यंत पावसाची रिमझिम सुरुच होती. त्यामुळे आज दिवसभर सुर्यदर्शन झालेच नाही. जिल्हयाला येलो अलर्ट लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेच आदेश देण्यात आले आहे. जिल्हयात ता. ३० जुलै पर्यंत पावसाचा अंदाज असल्याचे हवामान खात्याने कळविले असून त्यानुसार यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
