Eknath Khadse Challenges Girish Mahajan; Personal Photos | महाजन-खडसे यांच्यातील वाद शिगेला: गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांचे पाय चाटतात, त्यांच्यामुळे मला भाजप सोडावी लागली – एकनाथ खडसे – Maharashtra News

Advertisements
Advertisements



भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आता दोघांमध्ये प्रफुल्ल लोढा याच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहे. गिरीश महाजन यांनी आज सकाळी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांच्या सोबतचे दोन फोटो पोस्ट करून दोघांमध्ये

Advertisements

.

महाराष्ट्रात सध्या गाजत असलेला हनीट्रॅपचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. हनी ट्रॅप प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रफुल लोढा याच्या संदर्भाने गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जुंपली आहे. एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधत गिरीश महाजनांनी पोस्ट केलेल्या फोटोवर भाष्य करता त्यांच्यावर हल्ला चढवला आहे.

नेमके काय म्हणाले एकनाथ खडसे?

गिरीश महाजन यांनी माझा जो फोटो ट्विट केला आहे तो बोलका फोटो नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले. बोलका फोटो ट्विट करा, जे मी केले ते करा असे आव्हानही खडसे यांनी गिरीश महाजनांना दिले. या गुलाबी गोष्टी कोणासोबत केल्या, यासंदर्भात मीही तुमचे अनेक फोटो देऊ शकतो. योग्य वेळ येऊ द्या, असा इशाराही एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना दिला.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, महाजन म्हणताय की, तुम्ही दिल्ली दरबारी लोटांगण घालता. पण मी तुमच्यासारखे मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरत नाही. कुठेही लोटांगण घालत नाही. देवा भाऊचे पाय मी चाटत नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

मी 40 वर्ष रक्ताचे पाणी करुन भाजप पक्ष वाढवला. पण गिरीश महाजन यांच्या वादामुळे मला भाजपातून बाहेर जावे लागले. हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, असेही खडसे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

गिरीश महाजन यांनी पोस्ट शेअर करत खडसे यांच्यावर पलटवार केला. यामध्ये महाजन यांनी म्हटले की, ‘एकनाथ खडसे… तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय…हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे… २०१९ ते २०२२ च्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच… आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय? एकनाथ खडसे… काय तुझी हि व्यथा…!’

Advertisements
  • Related Posts

    Sunetra Pawar attends RSS Event; Ajit Pawar Reacts | खासदार सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती: कंगणा राणौत यांनी दिली माहिती, प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांसमोर जोडले हात – Maharashtra News

    खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेच्या ‘राष्ट्र सेविका समिती’ च्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणौत यांनी…

    Shivsena Protest Shivaji Nagar Underpass Water Leak | शिवाजीनगर भुयारी मार्गात पाणी गळती: शिवसेना ठाकरे गटाचे ‘आठवा अजूबा’ आंदोलन, पालकमंत्र्याच्या दबावापोटी घाईत उद्घाटन केल्याचा आरोप – Chhatrapati Sambhajinagar News

    छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज गुरुवार २१ ऑगस्ट रोजी जोरदार आठवा अजूबा आंदोलन करण्यात आले. महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *