अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी १४ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या मूलभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेतला. अभियानांतर्गत सुविधा उपलब्ध करून घेण्याचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ही बैठक झाली. अभियानातील सात उद्दिष्टांनुसार पूर्ण झालेली, सुरू असलेली आणि प्रलंबित कामांची तालुकानिहाय माहिती गांधी यांनी घेतली. आगामी कामांची अंदाजपत्रके आधीच तयार ठेवावीत, असे त्यांनी सांगितले. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामे लगेच सुरू करता येतील, असे नियोजन बैठकीत करण्यात आले. आरोग्य, एकात्मिक बाल विकास, शिक्षण, पाणीपुरवठा, बांधकाम आणि वीज विभागांच्या समन्वयातून हे अभियान राबवले जात आहे. सर्व ग्रामपंचायतींना मूलभूत सुविधा देणे आणि अभियानाची उद्दिष्टे ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे, यावर बैठकीत भर देण्यात आला. बैठकीला जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख आणि १४ तालुक्यांचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. ‘मिशन २८’साठी ऑनलाइन प्रशिक्षण मेळघाटातील माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या ‘मिशन २८’मध्ये आता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सीईओ सत्यम गांधी यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी तालुक्यातील साद्रावाडी आरोग्य केंद्रात प्रायोगिक ऑनलाइन प्रशिक्षण झाले. मेळघाटात १ जानेवारी २०२२ पासून हा आरोग्य उपक्रम सुरू आहे. त्याची व्याप्ती आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 6 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation राष्ट्रवादीत नाराजीच्या चर्चा फेटाळल्या:सुनेत्रा पवारांसोबत मुंबईत कोअर कमिटीची बैठक, तटकरेंनी सांगितलं आज काय घडलं? अमरावतीतून आंतरराष्ट्रीय धनुर्धर घडतील:स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या धनुर्विद्या मैदानाच्या उद्घाटनावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास