राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीच्या सणापूर्वीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारकडून दिली जाणारी 5 हजार रुपयांची मदत ही अंतिम नसून केवळ अग्रिम (अ‍ॅडव्हान्स) स्वरूपातील आहे. शेतकऱ्यांना यापुढे अधिकची मदत मिळणारच असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त जनता आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी आणि संकटाच्या काळात सरकार आपल्या सोबत आहे, असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी तत्परतेने हा निर्णय घेतल्याचे गोरे यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी दिवाळीपूर्वीच आर्थिक मदत देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांकडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी चारा आणि दैनंदिन खर्च भागवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनाने आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वागत करत मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. 5 हजार रुपये म्हणजे केवळ अग्रिम मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या 5 हजार रुपयांच्या मदतीबाबत जयकुमार गोरे यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. ही रक्कम म्हणजे शेतकऱ्यांना दिलेली अंतिम नुकसानभरपाई नाही. सध्याच्या अडचणीच्या काळात तातडीचा दिलासा मिळावा, यासाठी सरकारकडून अग्रिम स्वरूपात ही मदत दिली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यापुढे अधिकची मदत मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांना केवळ तात्पुरत्या मदतीवर अवलंबून राहावे लागणार नाही, असा विश्वासही त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त होत आहे. सध्या दिली जाणारी रक्कम ही सुरुवातीची मदत असून, पुढील मदतीबाबत शासनाकडून कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीपूर्वी मदत देण्यावर सरकारचा भर दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात काही प्रमाणात दिलासा मिळावा, यासाठी दिवाळीपूर्वीच मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सणाचा खर्च, घरातील दैनंदिन गरजा आणि शेतीशी संबंधित आर्थिक अडचणी अशा अनेक जबाबदाऱ्या शेतकऱ्यांवर आहेत. अशा परिस्थितीत खात्यावर जमा होणारी 5 हजार रुपयांची रक्कम त्यांना तात्पुरता आर्थिक आधार देणारी ठरणार आहे. राज्य सरकारकडून या मदतीचे वितरण सुरू करण्यात आले असून, पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. दुष्काळाच्या संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. हेही वाचा… जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज छाननीतच राजकीय संघर्ष:रक्षा खडसेंच्या अर्जावर शिंदेसेनेची हरकत, खडसेंनीही घेतली आक्रमक भूमिका जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीच्या टप्प्यावरच भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद समोर आले असून, दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जांवर हरकती नोंदवल्या आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला, तर त्याला प्रत्युत्तर देत रक्षा खडसे यांनीही मुक्ताईनगर तालुक्यातील शिंदे गटाच्या तीन उमेदवारांच्या अर्जांवर हरकत नोंदवली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरू लागली आहे. सविस्तर वाचा….

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search