[ads1]


मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात शनिवारी सकाळी दोन विरोधी गटांमध्ये गोळीबार झाला. त्यात कुकी समुदायाच्या ३ जणांचा मृत्यू झाला. ही चकमक डोंगराळ, जंगल परिसरातील ‘केकरू नगा’ गावात झाली. या ठिकाणी अनेक तास दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू होता. पोलिसांनी सांगितले की, परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कुकी समुदायाची प्रमुख संघटना ‘कुकी इनपी मणिपूर’ (KIM) ने नगा बंडखोर गटांवर हत्येचा आरोप केला आहे. तसेच दोषींवर तातडीने कठोर कारवाई करून न्याय देण्याची सरकारकडे मागणी केली आहे. मणिपूरमध्ये मैतेई समुदायाची रॅली मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये शनिवारी मैतेई संघटनांनी रॅली काढली. यात स्थानिक लोकांच्या सुरक्षेची आणि कुकी उग्रवादी गटांसोबतचा सस्पेंशन ऑफ ऑपरेशन (SoO) करार रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या रॅलीला अनेक नागा संघटनांचा पाठिंबा मिळाला. चंदेल आणि सेनापती जिल्ह्यांतही नागा संघटनांनी रॅली काढल्या. मणिपूरमध्ये मे २०२३ पासून जातीय हिंसाचार सुरू आहे. निदर्शकांनी ‘सेव्ह मणिपूर’ लिहिलेले पोस्टर हातात घेतले होते ही रॅली मणिपूर इंटिग्रिटीच्या समन्वय समितीने आयोजित केली होती. नागा संघटनांची सर्वोच्च संस्था युनायटेड नागा कौन्सिल (UNC) नेही रॅलीला पाठिंबा दिला. निदर्शकांनी ‘सेव्ह मणिपूर’ लिहिलेले पोस्टर आणि फलक हातात घेतले होते. त्यावर ‘आम्हाला शांतता आणि न्याय हवा आहे’ आणि ‘SoO करार रद्द करा’ अशा मागण्या लिहिल्या होत्या. मणिपूरमध्ये जातीय हिंसाचारात 300 हून अधिक मृत्यू मणिपूरमध्ये मे 2023 पासून खोऱ्यात राहणारे मैतेई आणि डोंगराळ भागात राहणारे कुकी समुदाय यांच्यात जातीय संघर्ष सुरू आहे. यात किमान 306 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. राज्यात कुकी आणि नागा समुदायांमधील संघर्षातही यावर्षी फेब्रुवारीपासून सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला आहे. मे 2023 मध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर प्रथमच सुरक्षा दलांनी कुकी दहशतवाद्यांसाठी उभारलेल्या एका छावणीचा ताबा घेतला आहे. छावणीत नोंद असलेल्या 159 दहशतवाद्यांपैकी केवळ एक जण तेथे आढळला. यानंतर SoO कराराच्या पालनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. हा करार 4 सप्टेंबर रोजी नूतनीकरण न करता संपुष्टात आला होता.

[ads2]

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search