जालन्यात 100 कोटी रु. किमतीची 11 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न:न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख उपअधीक्षकांसह 5 जणांवर गुन्हा

0
orig_730-x-548-new-2026-04-27t063107273_1777251635.jpg




जालना शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली ११ एकर जमीन हडपण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन दुय्यम निबंधक आणि भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध फसवणूक व गुन्हेगारी कटाचा गुन्हा कदीम जालना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या जमिनीचे बाजारमूल्य १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. उच्चपदस्थ अडकणार : तक्रारदार अंकित आबड यांची सर्व्हे नंबर ५५४ मध्ये मालकीची जमीन आहे. या जमिनीवरून १९८६ पासून न्यायालयात वाद सुरू आहे. मात्र, संशयित संध्या डागा यांनी कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन करून आणि तक्रारदाराला कोणतीही नोटीस न देता २० ऑगस्ट २०२१ रोजी आशिष छाजेड यांच्या नावाने बनावट मुखत्यारपत्र तयार केले. याच आधारे ६ मे २०२२ रोजी मालमत्ता पत्रकावर (PR Card) स्वतःचे नाव नोंदवून घेतले. पोलिस निरीक्षक आरती जाधव यांच्या तपासणी अहवालामुळे या प्रकरणातील गुंतागुंत समोर आली. या प्रकरणात आता आणखी कोणाकोणाचा समावेश आहे याचा पोलिस शोध घेत आहेत. संशयितांनी काेणती बनावट कागदपत्रे सादर केली, त्यासाठी कोणते पुरावे जोडले, अधिकाऱ्यांनी कोणत्या नियमांचा भंग केला तसेच त्यासाठी त्यांना इतर कोणी मदत केली या बाबी तपासात समोर येणार आहेत. जालना मनपातील काही कर्मचाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. इनसाइड स्टोरी – मनपातून पुरावे गायब? जालन्यात केवळ महसूल विभागच नव्हे, तर महानगरपालिकेतूनही या प्लॉटिंगचे नकाशे आणि महत्त्वाची कागदपत्रे बदलण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. याबाबतचे ठोस पुरावे लवकरच पोलिसांना दिले जाणार असल्याचे तक्रारदारांनी सांगितले. पीआर कार्ड असताना बेकायदेशीर विक्री करारनामे तत्कालीन उपअधीक्षक (भूमी अभिलेख) रवींद्र मुथा आणि तत्कालीन सह दुय्यम निबंधक बी. बी. वाडेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. जमिनीचा ताबा नसताना आणि रद्द झालेले पीआर कार्ड असतानाही त्यांनी बेकायदेशीरपणे विक्री करारनामे नोंदवले. पोलिसांनी सुरुवातीला दखल न घेतल्याने आबड यांनी न्यायालयात धाव घेतली होती. असे आहे जमिनीचे मूल्य मंठा चौफुली परिसरातील या जमिनीचे दर ५ ते १५ हजार रुपये प्रतिचौरस फूट आहेत. ५ हजार रुपये दराने मोजले तरी १ गुंठ्याची किंमत ५४ लाख ४५ हजार रुपये होते. यामुळे संपूर्ण ११ एकर जमिनीचा आकडा १०० कोटींच्या घरात जाते. प्रकरणातील आरोपी संध्या डागा, राजेंद्र डागा (हिंगणघाट), आशिष छाजेड (जालना), रवींद्र मुथा (तत्कालीन उपअधीक्षक) आणि बी. बी. वाडेकर (तत्कालीन दुय्यम निबंधक).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed