राजस्थानी मल्टिस्टेट प्रकरण: परळीच्या क्रेडीट सोसायटीत हिंगोलीतील ग्राहकांच्या 5 कोटींच्या ठेवी अडकल्या, जिल्हा प्रशासनाकडे धाव – Hingoli News

Advertisements
Advertisements

हिंगोली शहरात दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या परळी येथील राजस्थानी मल्टिस्टेट कॉपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीकडे जिल्ह्यातील खातेदारांच्या सुमारे ५ कोटींच्या ठेवी अडकल्या असून आता या ठेवी मिळाव्यात यासाठी खातेदारांनी मंगळवारी ता. १६ जिल्हा प्रशासनाकडे धा

Advertisements

.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परळी येथील राजस्थानी मल्टिस्टेट कॉपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीची परळी वैजनाथ यांची हिंगोली शहरात सन २०२३ मध्ये शाखा स्थापन करण्यात आली. या शाखेत जास्तीत जास्त ठेवी मिळाव्यात या उद्देशाने पतसंस्थेच्या संचालकांनी हिंगोली शहरातील काही जणांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर हिंगोलीत भव्यदिव्य कार्यक्रम घेऊन शाखा सुरु केली होती. यावेळी उपस्थित अध्यक्ष व संचालक मंडळांनी पतसंस्थेच्या ४० ठिकाणी शाखा असल्याचे सांगत ठेवीवर १२ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर शहरातील व्यापारी वर्गाशी संपर्क साधून त्यांना ठेवी ठेवण्याचा आग्रह केला.

त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सामान्य नागरीक व व्यापाऱ्यांनी सुमारे ५ कोटी रुपयांच्या ठेवी या ठिकाणी ठेवल्या होत्या. त्यानंतर ठेवीची मुदत संपल्यानंतर खातेदारांनी पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र त्यांना सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हिंगोलीच्या कार्यालयाला कुलुप ठोकून पोबारा केला.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकांनी परळी वैजनाथ येथील संचालकांसोबत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणासोबतही संपर्क झाला नाही. त्यानंतर आज खातेदार दीपक अग्रवाल, आनंदा बोरसे, अनंत कुमार चांडक, मुरलीधर मुंदडा, यादव डाखोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्याकडे निवेदन देऊन आमची रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Advertisements
  • Related Posts

    MSEDCL Ganesh Mandal Power Connection Domestic Rates | महावितरणची गणेश मंडळांना भेट: तात्पुरत्या वीज जोडणीसाठी घरगुती दर, सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन – Hingoli News

    सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध् केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी अधिकृत वीजपुरवठा घेऊनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन…

    Raj Thackeray Meets CM Fadnavis at ‘Varsha’ Following BEST Poll Rout | बेस्ट पराभवानंतर राज ठाकरे ‘वर्षा’वर: सीएम फडणवीस यांची घेतली अचानक भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण – Mumbai News

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *