विठ्ठलवाडीत आषाढी एकादशी उत्साहात साजरी: 21 हजार किलो खिचडी महाप्रसाद आणि 25 हजार रोपांचे वाटप – Pune News

Advertisements
Advertisements

‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रम संपन्न झाला. सतीश मिसाळ फाउंडेशनच्या वतीने यावेळी भाविकांसाठी २१ हजार किलो खिचडीचे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Advertisements

.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. तसेच नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ व दीपक मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

कार्यक्रमाचे संयोजन अजय डहाळे, श्रीकांत जगताप, ज्योती गोसावी, नलिनी गोसावी, शरद मोरे आणि प्रसन्न जगताप यांनी केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांच्या सेवेसाठी आणि अध्यात्मिक वातावरणासाठी खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’ च्या गजरात आषाढी एकादशीचा आनंद लुटला.

श्री स्वामी बॅग्जच्या वतीने २५ हजार रोपांचे वाटप

आषाढी एकादशी निमित्त श्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन सेवा संस्था यांच्या कडून २५००० रोपांचे वाटप करण्यात आले. यात तुळस, औषधी व देशी वृक्षांचा समावेश होता. हा उपक्रम गेली २४ वर्ष राबवण्यात येत होता. यंदाचे वर्ष २५ वे असल्याने रौप्य महोत्सवा निमित्त २५००० वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमान येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी राहुल जगताप, प्रफुल्ल जगताप, दीपक परदेशी, मिथिला राहुल जगताप, वैभवी राहुल जगताप, कु.प्रणोती प्रफुल्ल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या तुकाराम महाराजांच्या उक्ती नुसार पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण हे महत्वाचे आहे. यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे राहुल जगताप यांनी नमूद केले.

Advertisements
  • Related Posts

    Sinhagad Tourist Falls Valley | हैदराबादहून आलेला पर्यटक सिंहगडावर बेपत्ता: हवा पॉइंट जवळ सापडली गौतमची चप्पल, दरीत कोसळल्याची शंका; बचावकार्य सुरू – Pune News

    पुण्याजवळील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. हैदराबादहून आलेल्या एका पर्यटकाचा तानाजी कड्यावरून पाय घसरून तो खोल दरीत कोसळला. गौतम गायकवाड (24) असे या तरुणाचे नाव असून तो…

    Raju Shetti Sends Legal Notice Toll Collection | पुणे ते कोल्हापूर महामार्गावर टोलवसूली बंद करण्यात यावी: राजू शेट्टी यांची मागणी, कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा – Kolhapur News

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *