
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर बंद करण्यात आलेल्या दादर कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. न्यायालयाच्या निर्णयावर जैन समाजाने तीव्र नाराजी दाखवली असून 6 ऑगस्ट रोजी त्यांनी हल्लाबोल करत दादरमध्ये मोठे आंदोलन केले. तसे
.
अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्र समाजाचे आणि जैन समाजाचे जे वाद चालले आहेत कबुतरांच्या विषयावरून, मला असे वाटते की जैन समाजाच्या काही चेस्ट फिजिशीयन डॉक्टरांनी त्यांच्या समाजाला समजावण्याचा प्रयत्न करावा. हे सरकारकडून करवण्यात आले तर अतिउत्तम. कारण हिस्टोप्लास्मोसिस आणि क्रिप्टोकोकोसिस सारखे असंख्य बॅक्टेरिअल आणि फंगल इन्फेक्शन होतात. न्यूमोनिया, रेस्पिरेटरी डिसॉर्डर होतात.
पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, याच गोष्टी त्यांच्याच समाजातील डॉक्टर्सनी जैन मुनींना समजाऊन सांगितले तर बरे होईल. कारण, उगाच वाद करण्यात काहीच अर्थ नाही. आताच्या घटकेला या गोष्टी व्यवस्थित या समाजाला समजावल्या पाहिजेत. कारण, काही प्रथा रूढी जीवाला घातक असल्या तर या थांबवायला पाहिजेत. ही समज त्यांना दिली तर हा वाद नक्कीच मिटेल, असा विश्वास दमानिया यांनी व्यक्त केला आहे.
उच्च न्यायालयाने काय म्हटले?
या प्रकरणात उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले आहे. नागरिकांचे आरोग्य आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे पालिकेचे कर्तव्य असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे आम्ही दिलेल्या आदेशाचा कुणीही अवमान करू नये. आमच्या आदेशाविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात दात मागू शकतात, असे देखील उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या संदर्भात अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमावी, असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत.