Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate Meets Ajit Pawar Amid Rummy Video Controversy | माणिकराव कोकाटे मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला: मंत्रिपदावर काय निर्णय होणार? राजीनामा घेतला जाणार की खाते बदलणार? – Mumbai News

Advertisements
Advertisements



महाराष्ट्राचे कृषिमंत्री व अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना माणिकराव कोकाटे मोबाइलवर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झा

Advertisements

.

विधिमंडळात रम्मीचा डाव

राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला अनेक मुद्यांवरून कोंडीत पकडल्याचे पाहायला मिळाले. त्यात भर पडली ती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळतानाच्या व्हिडिओची. त्यांचा मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून रमी खेळत बसणारा कृषिमंत्री नको, असे म्हणत विरोधकांनी कडाडून विरोध केला. याचे पडसाद बाहेरही पाहायला मिळाले. अनेक शेतकरी संघटनांनी देखील कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

माणिकराव कोकाटेंचे वादग्रस्त विधान

भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो, असे वक्तव्य कोकाटे यांनी केले. हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या विरोधात नाही तर सरकारला उद्देशून आहे, असे सांगताना पुन्हा चूक केली आणि शेतकरी भिकारी नाही, तर सरकार भिकारी आहे, वादग्रस्त विधान केले. कांदा काढल्यानंतर आता काय ढेकळांचा पंचनामा करायचा का? आणि पीक विम्याची रक्कम घेऊन तुम्ही मुला, मुलींची लग्ने, साखरपुडा करता. ती रक्कम शेतीत गुंतवत नाही, अशी वादग्रस्त विधाने माणिकराव कोकाटे यांनी केली आहेत.

Advertisements
  • Related Posts

    Raju Shetti Sends Legal Notice Toll Collection | पुणे ते कोल्हापूर महामार्गावर टोलवसूली बंद करण्यात यावी: राजू शेट्टी यांची मागणी, कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा – Kolhapur News

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली…

    Sunetra Pawar attends RSS Event; Ajit Pawar Reacts | खासदार सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती: कंगणा राणौत यांनी दिली माहिती, प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांसमोर जोडले हात – Maharashtra News

    खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेच्या ‘राष्ट्र सेविका समिती’ च्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना राणौत यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *