Shani Shingnapur Devasthan Deputy CEO Nitin Shete commits suicide by hanging himself, Minister Vikhe claims that he committed suicide because he was involved in a scam | घोटाळ्यात होते म्हणून केली आत्महत्या,मंत्री विखेंचा दावा: शनिशिंगणापूर देवस्थानचे डेप्युटी सीईओ नितीन शेटे यांची गळफास घेत आत्महत्या – Ahmednagar News

Advertisements
Advertisements



शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सूर्यभान शेटे (४३, रा. घोडेगाव रोड, शनिशिंगणापूर) यांनी साेमवारी राहत्या घरासमोरील स्टोअर रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास उघड झाला. आधीच बन

Advertisements

.

नितीन शेटे हे मागील १४ वर्षांपासून देवस्थानमध्ये कार्यरत आहेत. पूर्वी ते विश्वस्त होते, तर मध्यंतरी त्यांची उपकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. अकरावीत असलेल्या मुलाच्या शिक्षणासाठी अहिल्यानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या त्यांच्या पत्नी साेमवारी सकाळी नितीन यांना फाेनवरून संपर्क साधत हाेत्या. मात्र अनेकदा फाेन केल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी नातेवाइकांना फाेन करून घरी जाऊन पाहण्यास सांगितले. पण ते घरी सापडले नाहीत. बराच शोध घेतल्यानंतर नितीन त्यांच्या बंगल्यासमोरील एका स्टोअर रुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. याबाबत अभिषेक अरुण शेटे यांनी शनिशिंगणापूर ठाण्यात माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच शिंगणापूर पोलिस ठाण्याचे सपोनि आशिष शेळके व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. शेटे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी नेवासे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरासमोरील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुसाईड नोट मिळाली नाही

पोलिसांना घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट मिळाली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांचा मोबाईल पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना कुणावर संशय आहे का,अशी विचारणाही केली. पण ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

शेटे यांना चौकशीसाठी बोलावले नाही, आत्महत्येचा रितसर तपास होईल

नितीन शेटे यांनी शनेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त होते. सिव्हिल इंजिनिअर असल्याने देवस्थानने त्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केले. ५ वर्षांपासून ते देवस्थानचे सहायक उपकार्यकारी अधिकारी होते. संस्थानचे दैनंदिन कामकाजही ते पाहायचे. ॲप घोटाळा प्रकरणात शेटे यांना चौकशीसाठी बोलावले नव्हते. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेचा रितसर तपास हाेईल, असे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Advertisements
  • Related Posts

    Sinhagad Tourist Falls Valley | हैदराबादहून आलेला पर्यटक सिंहगडावर बेपत्ता: हवा पॉइंट जवळ सापडली गौतमची चप्पल, दरीत कोसळल्याची शंका; बचावकार्य सुरू – Pune News

    पुण्याजवळील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. हैदराबादहून आलेल्या एका पर्यटकाचा तानाजी कड्यावरून पाय घसरून तो खोल दरीत कोसळला. गौतम गायकवाड (24) असे या तरुणाचे नाव असून तो…

    Raju Shetti Sends Legal Notice Toll Collection | पुणे ते कोल्हापूर महामार्गावर टोलवसूली बंद करण्यात यावी: राजू शेट्टी यांची मागणी, कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा – Kolhapur News

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *