
मराठवाड्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. विभागातील तब्बल 44 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 15, नांदेड जिल्ह्यातील 10, हिंगोली जिल्ह्यातील 9, जालना जिल्ह्यातील 9 आणि लातूर जिल्ह्यातील 1 महसूल मंडळांचा स
.
मागील सलग तीन दिवस मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसला. त्याआधी जवळपास वीस दिवस पावसाने मराठवाड्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली होती. तसेच मराठवाड्यातील लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्येही पुरेसा जलसाठा होऊ शकला नव्हता.
24 जुलैपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आणि संपूर्ण मराठवाडा ओलाचिंब झाला. अनेक छोटे प्रकल्प पाण्याने भरून गेले. काही जिल्ह्यांत नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला.

शनिवारी सकाळी 8 वाजेपासून रविवारी 8 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी 32.9 मिमी पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक 52.4 मिमी पाऊस बरसला. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात 47.1 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वात कमी 15.5 मिमी पाऊस परभणी जिल्ह्यात झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 39.2 मिमी, नांदेड जिल्ह्यात 38.5 मिमी, लातूर जिल्ह्यात 25.7 मिमी, बीड जिल्ह्यात 19.6 मिमी आणि धाराशीव जिल्ह्यात 16.9 मिमी पावसाची नोंद झाली.
अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हयातनगर आणि टेंभुर्णी येथे सर्वाधिक 105 मिमी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाबरा येथे 95 मिमी पावसाची नोंद झाली. श्रावणात झालेल्या या पावसाने शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे.