
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याप्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिलेत. मी यापूर्वीच त्यांना इजा झाले बिजा झाले आता तिजा होऊ देऊ नक
.
अजित पवार गुरूवारी दुपारी एका बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हायरल व्हिडिओ, हनी ट्रॅप प्रकरण, कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्या प्रकरण, मराठी – अमराठी वाद आदी विविध मुद्यांवर भाष्य केले. विशेषतः यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, झाला प्रकार विधिमंडळाच्या आत घडला आहे. विधानसभेचे अध्यक्ष व विधानपरिषदेच्या सभापतींनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. माणिकराव कोकाटे अजून मला समक्ष भेटले नाहीत. त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे आपण तसे काहीही खेळत नसल्याचा दावा केला. ते मला सोमवारी भेटण्याची शक्यता आहे.
इजा झाले बिजा झाले, तिजा होऊ देऊ नका
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर आम्ही सर्वच आमदारांना प्रत्येकाने आपल्यावर राज्याची जबाबदारी आहे, त्यामुळे आपण भान ठेवून वागले पाहिजे, निर्णय घेतले पाहिजे, अशा सक्त सूचना केल्या होत्या. मागे एकदा त्यांच्याकडून असेच काही गोष्ट घडली. तेव्हाही मी त्याची गंभीर दखल घेतली होती. पुन्हा असे होता कामा नये असे सांगितले होते. दुसऱ्यांदा घडले. तेव्हाही मी त्यांना इजा झाले बिजा झाले आता तिजा होऊ देऊ नका याची जाणिव करून दिली. परंतु आता या बाबतीत ते मी ते खेळत नसल्याचे सांगत आहे. नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच. पण सोमवारी किंवा मंगळवारी माझी त्यांच्याशी चर्चा होईल. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी या प्रकरणी योग्य तो निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
सरकारला कमीपणा येईल असे वागू नका
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री कोकाटे खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. पत्रकारांनी याविषयी अजित पवारांना छेडले असता त्यांनी कोण काय बोलतो? याच्याशी आपल्याला काहीही देणेघेणे नसल्याचे ठणकावून सांगितले. या प्रकरणी कोण काय बोलतो याच्याशी माझे काहीही देणेघेणे नाही. पण महायुती सरकारला कमीपणा येईल असे काम सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही नेत्याने करता कामा नये, असे ते म्हणाले.
आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…