Pawan Lodha Slams Eknath Khadse Over Honeytrap Allegations | Political Storm in Maharashtra | ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात खळबळ: पवन लोढांचा खडसेंवर पलटवार;’माझ्या वडिलांना अडकवून महाजनांना बदनाम करण्याचा डाव’ – Jalgaon News

Advertisements
Advertisements



राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात आता नवा वळण आला आहे. या प्रकरणात अटकेत असलेले जामनेर तालुक्यातील प्रफुल्ल लोढा यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार, अश्लील छायाचित्र काढणे, डांबून ठेवणे आण

Advertisements

.

या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोढा हे भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. यावर प्रफुल्ल लोढा यांचे पुत्र पवन लोढा यांनी माध्यमांसमोर येत खडसेंच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला आहे.

वडिलांविरुद्ध केलेले आरोप खोटे

पवन लोढा म्हणाले की, माझ्या वडिलांविरुद्ध केलेले सर्व आरोप खोटे आहेत. गिरीश महाजन यांना बदनाम करण्यासाठी एकनाथ खडसे आणि त्यांचे ‘मोठे साहेब’ यांनी हे संपूर्ण षड्यंत्र रचले आहे. आमची संपत्ती वडिलोपार्जित असून काहीही लपवण्यासारखे आमच्याकडे नाही.

खडसे तेव्हा आमच्याकडे पैसे मागायला येत

पवन लोढा म्हणाले की, जेव्हा खडसे गाडीला रॉकेल टाकून फिरायचे, तेव्हा ते माझ्या वडिलांकडे पैसे मागायला यायचे. आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. पोलिसांनी जप्त केलेल्या सीडी आणि पेन ड्राइव्हमध्ये माझे महावितरण कंपनीचे काम आहे.

खडसेंनी भ्रष्टाचार करत संपत्ती कमावली

पवन लोढा म्हणाले की, गिरीश महाजन आमच्यासाठी दैवत आहेत. खडसे यांनीच भ्रष्टाचार करून संपत्ती कमावली आहे. माझ्या वडिलांनी पूर्वी गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या मतभेदांबाबत खुलासाही केला होता. मात्र ते मतभेद खडसे आणि अनिल देशमुख यांच्या डावपेचांमुळे झाले होते. निखिल खडसे यांच्या मृत्यूनंतर प्रफुल्ल लोढा भावनिक पणे व्यथित झाले होते आणि त्यांनी त्याबाबत एसआयटी चौकशीची मागणीही केली होती. ही चौकशी झालीच पाहिजे, असा पुनरुच्चार पवन लोढा यांनी केला.

त्यामुळे संशय वाढला- खडसे

दरम्यान, पवन लोढा यांच्या या आरोपांनंतर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये कोणत्याही ‘मोठ्या साहेबांचा’ संबंध नाही. उलट प्रफुल्ल लोढा यांनी स्वतःच्या व्हिडिओमध्ये गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांचे नाव घेतले होते. त्यामुळे मला शंका वाटू लागली आहे, असे खडसे यांनी म्हटले. या आरोप-प्रत्यारोपामुळे प्रकरण अधिकच तापले असून राजकीय वर्तुळात या वादळाचे पडसाद उमटत आहेत.

Advertisements
  • Related Posts

    Sinhagad Tourist Falls Valley | हैदराबादहून आलेला पर्यटक सिंहगडावर बेपत्ता: हवा पॉइंट जवळ सापडली गौतमची चप्पल, दरीत कोसळल्याची शंका; बचावकार्य सुरू – Pune News

    पुण्याजवळील प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. हैदराबादहून आलेल्या एका पर्यटकाचा तानाजी कड्यावरून पाय घसरून तो खोल दरीत कोसळला. गौतम गायकवाड (24) असे या तरुणाचे नाव असून तो…

    Raju Shetti Sends Legal Notice Toll Collection | पुणे ते कोल्हापूर महामार्गावर टोलवसूली बंद करण्यात यावी: राजू शेट्टी यांची मागणी, कार्यवाही न केल्यास अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा – Kolhapur News

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव हद्दीत टोल वसूली बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठवली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *