
अमरावती आणि मोर्शी तालुक्याच्या सीमेवरील अडगाव ते पातूर या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे पातूर येथून अडगावला ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज त्रास सहन करावा लागतो. ही बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या लक्षात आण
.
प्रारंभी या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त सीइओ तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांची व्यथा ऐकूण घेत बांधकाम विभागाला तसे आदेश दिले. दरम्यानच्या काळात सीइओ संजीता महापात्रदेखील व्हीसी आटोपून त्यांच्या कक्षात दाखल झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचीही भेट घेतली. अतिरिक्त सीइओ प्रिती देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयाची माहितीसुद्धा यावेळी त्यांना सांगण्यात आली. सीइओ महापात्र यांनी शाळा व शिक्षणाबद्दल आणखी विचारपूस करुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीही जाणून घेतली. सीइओंच्या निर्देशानुसार संबंधित रस्ता तत्काळ दुरुस्त करावयाचा आहे.
यावेळी झालेल्या चर्चेनुसार पातुरच्या विद्यार्थ्यांना अडगाव येथील प्रगती विद्यालयात शिकायला जावे लागते. सायकल वा पायदळ असा त्यांचा प्रवास असतो. परंतु रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असल्याने त्यांना ते शक्य होत नाही. चर्चेत पाचवी ते दहावीचे विद्यार्थी अबोली फरतोडे, प्रणीती पांडे, कृष्णा नागपुरे, शौर्य भोगे, श्रेया वानखडे, कस्तुरी फरतोडे, चैताली भोगे, नैतीक नागपुरे, नंदिनी भोगे, वंशिका भोगे, कावेरी गतफणे, आयुष फरतोडे, सार्थक फरतोडे, उन्नती पांडे, वेदिका नागपुरे, इश्वरी राणे, पृथ्वीराज पांडे आदींनी सहभाग नोंदवला.