Advertisement

नांदेड शहरातील पंपटवार सुपर मार्केटला भीषण आग; आतापर्यंत आग विजवण्यासाठी अठरा गाड्या तैनात

नांदेड-शहरातील हिंगोली गेट कॉम्प्लेक्समधील पंपटवार किराणा सुपरमार्केटमध्ये भीषण आग . या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या तैनात करण्यात आल्या. आग सुमारे ६ तासांपासून धुमसत आहे. कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले पण कोणतेही जीवितहानी झाली नाही. आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांना आणि १२ भरलेल्या सिलिंडरना सुरक्षितपणे बाहेर काढले.

नांदेड शहरातील हिंगोली गेट परिसरात पंपटवार किराणा सुपरमार्केटमध्ये अचानक भीषण आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीची घटना २१ एप्रिल रोजी रात्री ११:०० वाजता घडली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण दुकान आणि घराला वेढले. माहिती मिळताच अग्निशमन दल आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल. अग्निशमन दलाच्या १८ गाड्या आग विझवण्यासाठी लागले.या इमारतीत पंपटवार कुटुंब राहते, ज्यांचेकडे सुपरमार्केट आणि किराणा दुकान आहे. आगीची माहिती मिळताच कुटुंबातील सर्व सदस्य आणि १२ भरलेले सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले पण कोणतीही जीवितहानी झाली नाही हि आग भयंकर होती. अचानक या सुपरमार्केटमध्ये आग लागली आणि काही क्षणातच आगीने भयानक रूप धारण केले आणि भोईमुंग, सोया आणि तेलाच्या टाक्या जळून खाक झाल्या. या सुपरमार्केटमध्ये गहू, तांदूळ, डाळी, सुकामेवा अशा सर्व प्रकारच्या किराणा मालाला आग लागल्याने सर्व सामान जळून खाक झालाय. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य कारणामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अग्निशमन विभागाचे कर्मचारी गेल्या सहा तासांपासून ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या १८ गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत आणि आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे. या भीषण आगीत सुमारे ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वृत्तलिहिपर्यंत आग विजवण्याचे काम सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?