नांदेड(प्रतिनिधी)-प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेवून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्रातील जनतेला सेवा देत असते. पण नांदेडमध्ये बस स्थानकाच्या तापुरत्या जागा बदलीमुळे प्रवाशांची लुट करण्यासाठी एक संधी ऍटो चालकांना प्राप्त झाली आहे. 3.8 किलो मिटरसाठी प्रत्येक प्रवाशाला 40 ते 80 रुपये भाडे आकारले जात आहे. त्यापेक्षा एस.टी.महामंडळाने आपला एक टप्पा प्रवासाचा दर लावून नांदेड शहरातल्या मामा चौकातील बस स्थानकापासून ते वजिराबाद चौकापर्यंत प्रवाशांची सोय केली तर एस.टी.महामंडळाचा व्यवसाय वाढेल आणि ऍटो चालकांकडून होणारी लुट थांबेल याकडे सुध्दा लक्ष देण्याची गरज आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी नांदेडला आले असतांना त्यांनी अचानकच बस स्थानकात जायचे आहे असे सांगितले आणि प्रशासनाची तारांबळ झाली. तरीपण खा.राहुल गांधी बस स्थानकात आले. नांदेड शहराच्या जनतेला आणि बसच्या माध्यमातून नांदेड शहरात येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानक ते बसस्थानक हा रस्ता किती छान आहे याचा अनुभव अनंत वर्षापासून आहे. तोच अनुभव खा.राहुल गांधी यांना मिळाला. त्यांनी परत जातांना उघड्या गाडीमध्ये उभे राहुल या रस्त्याची व्हिडीओ शुटींग तयार केली आणि त्यानंतर या बसस्थानकाच्या रस्त्याच्या कामाची सुरूवात झाली. म्हणून नांदेड शहराचे बसस्थानक सध्या मामा चौक कौठा येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य असणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या नोटबुकमध्ये मामा चौकात बस स्थानकात उभे राहण्यासाठी 10 चौरस फुटाची सावली सुध्दा नाही. एस.टी.बसेस उन्हात उभ्या राहतात. त्यामुळे आत बसणाऱ्या प्रवाशांच्या शरिरातला कोणताही भाग शिल्लक राहत नाही ज्यातून घाम निघत नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही.रात्री थांबणाऱ्या बसेसच्या सुरक्षेचाही विषयी सुध्दा या नवीन बसस्थानकात आहेच. अशा अनंत सुविधा ज्या प्रवाशांना दिल्या जातात. त्या उपलब्ध नाहीत. तरीपण म्हणतात ना गरजेला अक्कल नसते. म्हणून प्रवाशी तात्पुरत्या बसस्थानकात जात आहेत आणि तेथून आपला प्रवास सुरू करत आहेत.
यावर कहर होत आहे. तो बस स्थानकात जाणे आणि बस स्थानक आलेल्या प्रवाशांना आपल्या गनतव्याकडे जाणे. त्यासाठी स्थानिक वाहनांची गरज असते आणि स्थानिक वाहनांमध्ये सर्वात मोठी सोय ऍटोतून होते. नांदेड ते सिडको हे सात ते 9 किलो मिटरचे अंतर आहे. त्यासाठी वजिराबाद चौकातून 30 रुपये आणि जुना मोंढा येथून 20 रुपये असा दर ऍटो चालक घेतात आणि एका ऍटोमध्ये पाच ते सहा प्रवाशी घेवून जातात. याचा अर्थ त्यांच्या प्रत्येक फेरीचे 120 रुपये होतात. पण तात्पुरत्या बस स्थानकात ऍटो चालकांनी जनतेला लुटण्याचा धंदा सुरू केला आहे. त्यानुसार वजिराबाद चौक ते मामा चौक येथील तात्पुरते बसस्थानक येथे जाण्या-येण्यासाठी ऍटोचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. बसस्थानकाकडे जातांना या 3.8 किलो मिटरसाठी 20 रुपये आकारले जात आहेत. पण बस स्थानकातून वजिराबाद चौकाकडे येण्यासाठी मात्र दर प्रवाशाला 40 ते 80 रुपये आकारले जात आहे आणि एक ऍटो पुर्ण आपल्या एकट्याला घेवून जायचा असेल तर त्यासाठी 240 रुपये आकारले जात आहेत. या लुटीकडे कोण लक्ष देणार. पोलीसांचे हे काम नाही. कारण त्यांना इतर कामे भरपुर आहेत. आरटीओ विभाग आपल्याच कामात व्यस्थ आहे. पोलीस विभागातील वाहतुक शाखा यांना फक्त विस्कळीत वाहतुक दुरूस्त करायची आहे. मग ऍटो चालकांकडून होणाऱ्या या लुटीला थांबवेल कोण ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
एस.टी.महामंडळाने त्यांच्या नियमाप्रमाणे एक टप्याचे जे भाडे होते ते भाडे लावून काही एस.टी. गाड्या तात्पुरते बसस्थानक ते वजिराबाद चौक किंवा त्याही थोड्यापुर्वी तिरंगा चौक इथपर्यंत प्रवाशांची सोय केली तर एस.टी. महामंडळाचेही उत्पन्न वाढेल आणि आजपर्यंत त्रासलेली जनता एस.टी.महामंडळाला नक्कीच धन्यवाद देईल.
Leave a Reply