नांदेड(प्रतिनिधी)-दंडाधिकारी असलेल्या म्हणजे इतरांना तुरूंगात पाठविण्याचे अधिकार असलेल्या व्यक्तीला आज आपल्या पत्नीच्या तक्रारीमुळे स्वत:लाच तुरूंगात जावे लागण्याची वेळ आली. गडचांदुर जि.चंद्रपुर येथे तहसीलदार असलेल्या व्यक्तीविरुध्द त्याच्या पत्नीने दिलेली तक्रार आणि त्यात लावण्यात आलेली भारतीय दंड संहितेची कलमे, सोबत न्यायसहितेची कलमे, भारतीय हत्यार कायद्याची कलमे आणि नरबळी प्रथा व जादुटोणा कायद्याची कलमे जोडलेली आहेत.
11 मार्च रोजी 31 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे लग्न तहसीलदार पदावर असलेल्या अविनाश श्रीराम शेंबटवाड सोबत झाले. पण काही दिवसानंतर त्यात अनेक अडचणी येत गेल्या. या अडचणीदरम्यान विवाहितेचे सासरे श्रीराम शेंबटवाड, सासु पुष्पा शेंबटवाड आणि भाया अमोल शेंबटवाड हे तिला त्रास देत राहिले. 25 तोळे सोने असे स्त्रीधन घेवून लग्न झाले होते. त्यानंतर विवाहितेच्या वडीलाने 75 लाख रुपये वेगवेगळ्या वेळेस दिल्याचा आरोप आहे. सोबतच तहसीलदारच्या मित्रांनी दिलेल्या त्रास, घरच्यांनी दिलेला त्रास इतरांची वाईट नजर, अमानुष प्रथांसाठी वापरले जाणारे सर्व काम विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी केले. सोबतच तहसीलदाराने दोन वेळा रिव्हाल्वर ताणुन विवाहितेला मारण्याचा प्रयत्न पण केला.
काल शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे आणि त्यांचे अनेक सहकारी पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, महिला पोलीस अंमलदार तहसीलदार अविनाश श्रीराम शेंबटवाडला अटक केली. दाखल झालेल्या या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे 498(अ), 306, 354, 506(2), 323, 509, 504, 506, 34 सोबतच भारतीय न्याय संहितेतील कलमे 85, 109, 74, 351(3), 115(2), 79, 352, 351(2), 3(5) यासह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 आणि नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम 2013 मधील कलम 3(2) जोडलेली आहेत.
आज पोलीस निरिक्षक जालिंद तांदळे व त्यांच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्यांनी व पोलीस अंमलदारांनी तहसीलदार अविनाश श्रीराम शेंबटकर यांना न्यायालयात हजर करून गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने मात्र पोलीस कोठडीची पोलीसांची मागणी नाकारली. परंतू या प्रकरणात असलेल्या विविध कलमांमुळे सध्या तहसीलदारांची रवानगी तुरूंगात अर्थात न्यायालयीन कोठडीत झाली आहे.
Post Views: 99
Leave a Reply