नांदेड(प्रतिनिधी)-भोकर फाटा येथे एका धाब्यावर जेवण करून जेवणाचे पैसे देणे तर सोडाच सोबत दरमहा 25 हजार रुपये खंडणी दे अशी मागणी करून दिले नाही तर धाब्याला आग लावतो अशी धमकी देणाऱ्या विरुध्द अर्धापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भोकर फाटा येथे राहणारे धाबा व्यवसायीक मानाराम बजरंगरामजी चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता अर्धापूर येथील विशाल मधुकर डोलारकर (25) आणि आर्या सरोदे (27) हे दोघे जेवण करण्यासाठी आले. जेवनाचे बिल 500 रुपये झाले पण ते तर दिलेच नाहीत उलट दरमहा 25 हजार रुपये दे नाही तर तुझ्या धाब्याला आग लावून टाकतो अशी धमकी पण दिली. अर्धापूर पोलीसांनी या घटनेसंदर्भाने गुन्हा क्रमांक 209/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
धाबा चालकाला खंडणी मागणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल

Leave a Reply