नांदेड(प्रतिनिधी)-बसस्थानकावर एका प्रवासाचे पॉकिट पॉकिटमारांनी मारल्यानंतर ते पॉकिट बसस्थानकांवरील सुरक्षा रक्षकांनी घेतले. परंतू मालकाला परत दिले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी मोठा वाद झाला आणि त्या पॉकिट मालकालाच सुरक्षा रक्षकांनी चोप दिल्याचा प्रकार घडला. परंतू बिचारा प्रवासी कसा परत गेला देवच जाणे. अशा प्रकारे रक्षकच भक्षक निघाले असे म्हणण्याची वेळ आली आहे.
नांदेड बस स्थानकावर एक प्रवासी रात्री चंद्रपुर येथून आला. त्याला सकाळी देगलूरला जायचे होते. म्हणून तो युवक बसस्थानकातच झोपला आणि दिवस उजाडताच त्याच्या खिशातील पॉकिट चोरट्यांनी मारले. त्या चोरट्याला खाजगी संस्थेच्या सुरक्षा रक्षकांनी पकडले सुध्दा त्याच्याकडील पॉकिट घेतले सुध्दा पण ते पॉकिट त्या प्रवाशाला परत दिले नाही. तेंव्हा तो प्रवाशी युवक गोंधळ करू लागला. बसस्थानकावर हजर असणारे अनेक लोक त्या युवकाच्यावतीने बोलू लागले. कारण एक तर त्याचे पॉकीट मारले गेले आणि सुरक्षा रक्षक त्यालाच चोप देत होते. या प्रकरणाची व्हिडीओ रेकॉर्डींग झाली. त्यानंतर ती व्हायरल झाली. तेंव्हा कल्याणकर नावाच्या सुरक्षा रक्षकाने व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला सुध्दा धमकी वजा शब्दात त्याचा जाब विचारला. बसस्थानकात निवाऱ्यासाठी झोपलेला प्रवासी, त्याच्या खिशातून गायब झालेले पैसे, ते पैसे परत नकरता त्यालाच चोप आणि पैसे सुध्दा परत नाही असा हा प्रकार सुरक्षा रक्षकांनी केला म्हणजे रक्षकच भक्षक झाले याशिवाय दुसरे काय म्हणावे.
Post Views: 8
Leave a Reply