नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि दहा पोलीस उपनिरिक्षक अशा 12 पोलीस अधिकाऱ्यांचे खांदेपालट केले आहे. परंतू उस्माननगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांची नवीन बदलीच्या जागी कार्यमुक्तता करण्यात आलेली नाही. याचे काय गौड बंगाल असेल हे देवच जाणेल.
नांदेड पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत सहाय्यक पोलीस निरिक्षक मुंजाजी नामदेव दळवे(पोलीस ठाणे शिवाजीनगर), कमल विश्र्वनाथ शिंदे (पोलीस ठाणे बिलोली), पोलीस उपनिरिक्षक बाबु म्हैसाजी शिंदे (पोलीस ठाणे विमानतळ), शंकर धनाजी मोरे (पोलीस ठाणे कंधार), रवि निवृत्ती घोडके (पोलीस ठाणे हिमायतनगर), सुभाज संभाजी पवार-हिमायतनगर(वजिराबाद), परमेश्र्वर रामभाऊ सुर्यवंशी-सिंदखेड(अर्धापूर), संजय नन्हुराव मुंडे-माहूर(पोलीस ठाणे माळाकोळी), अशोक किशनराव बनसोडे-कंधार(पोलीस ठाणे शिवाजीनगर), देविदास बापुराव भिसाडे-बिलोली (विमानतळ), विठ्ठल काशिनाथराव दावलबाजे-नायगाव(पोलीस ठाणे इतवारा), कपिल केशवराव पाटील-नायगाव (पोलीस ठाणे नायगाव) अशा 12 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत.
जवळपास एक ते दीड वर्षापुर्वी अगोदर नागपुर शहर आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथे बदली झालेले उस्माननगर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार यांना मात्र बदलीच्या ठिकाणी जाण्यासाठी अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामागचे काय गौडबंगाल असेल हे देवच जाणे.
Post Views: 59
Leave a Reply