नांदेड(प्रतिनिधी)- एप्रिल महिन्याचा 28 वा दिवस हा सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज 1 एप्रिल रोजी जारी केला आहे. यावर विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
महाराष्ट्र लोकसभा हक्क अधिनियम 2015 चा संदर्भ देवून हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील नागरीकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक, गतीमान आणि कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारी करण्यात आला आहे. हा अधिनियम 28 एप्रिल 2015 रोजी अंमलात आला. म्हणूनच या पुढे अर्थात 10 वर्षानंतर 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्ळणून साजरा करण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. हा शासन निर्णय राज्य शासनाने संकेतांक 2025040115345478207 यानुसार आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
10 वर्षानंतर शासनाला जाग आली; 28 एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा होणार

Leave a Reply