Advertisement

गिग, प्लॅटफार्म वर्कर यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


नांदेड :- केंद्र सरकारने वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. तरी सर्व गिग कामगारांनी 1 एप्रिल 2025 पासून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी. तसेच सर्व ॲग्रिगेटर यांनी 31 मार्च 2025 पर्यत या register.esharm.gov.in/#/iser/platform-worker-registration संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

ई-श्रम पोर्टलवर केंद्र शासनाने गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व ॲग्रिगेटर यांची नोंदणी करण्यास सुरवात केलेली आहे. साधारणत: गिग व प्लॅटफॉर्म वर्कर शेरिंग वाहन कामगार, अन्न व किराणा पुरवठा करणारे कामगार, लॉजिस्टीक सेवा देणारे कामगार इ. मार्केटमध्ये ऑनलाईन काम करणारे कामगार, फ्रोफेशनल सर्विस देणारे कामगार, हेल्थ केअर सेवा देणारे कामगार, ट्रॅव्हल्स व आदरातिथ्य करणारे कामगार, मिडीया सर्विसेस इ. सर्व प्लॅटफार्म गिग वर्करच्या व्याखेत येतात. ॲमेझोन, फ्लीपकार्ट, मिंत्रा, स्नॅपडिल, अजिओ, मिशो, स्विगी, झोमॅटो अशा वेगवेगळया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार हे सर्व ई-श्रम esharm.gov.in वर नोंदीत होवू शकतील. केंद्र सरकारकडे डेटा तयार होईल म्हणून नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


Post Views: 36






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?