Advertisement

“Thank You भास्कर” शॉर्ट फिल्मला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दुहेरी सन्मान!

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये “Thank You भास्कर” या शॉर्ट फिल्मने आपली चमक दाखवत ‘बेस्ट शॉर्ट फिल्म’ आणि ‘बेस्ट सोशल शॉर्ट फिल्म’ हे दोन प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत.

पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या या शॉर्ट फिल्मचे लिखाण आणि दिग्दर्शन नामदेव दादा सोनवणे यांनी केले असून, विलास दादा कुगने आणि लक्ष्मीकांत जाधव यांनी अविष्कार फाउंडेशनतर्फे निर्मितीची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

दिग्दर्शकाच्या सामाजिक जाणीवेचा प्रभावी आविष्कार!
आजच्या घडीला पर्यावरण संवर्धन ही अत्यंत गरजेची बाब आहे. हा महत्त्वाचा विषय दिग्दर्शकाने प्रभावीपणे मांडला असून, त्याला प्रेक्षक आणि परीक्षकांकडूनही भरभरून दाद मिळाली आहे.

अर्जुन शिंदे यांच्या उत्कृष्ट छायाचित्रणामुळे फिल्मने दृश्यात्मकदृष्ट्या अधिक परिणामकारक रूप घेतले आहे. त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराने आपल्या उत्तम अभिनयाने कथानकाला न्याय दिला आहे. पडद्यामागील तांत्रिक टीमनेही अथक मेहनत घेतली असून, त्यामुळेच हा प्रकल्प यशस्वीरीत्या साकार झाला आहे.

फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
“Thank You भास्कर” लवकरच प्रदर्शित होणार असून, त्याबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
Join NandedLive
Hello
Can we help you?