नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाच्यावतीने सुरू आहे. त्यात काल दि.25मार्च रोजी सकाळी परेड झाली आणि त्यानंतर जिल्ह्याची गुन्हे परिषद सुध्दा झाली. या गुन्हे परिषदेत पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी अत्यंत भावनिकपणे एक प्रश्न विचारला. बंद करण्यात आलेली बेकायदा वाळू वाहतुक सुरु कशी झाली. याचे उत्तर कोणालाच देता आले नाही.
25 जुलै 2024 मध्ये पोलीस उपमहानिरिक्षक पदावर शहाजी उमाप यांची नियुक्ती झाली. शहाजी उमाप यांनी नांदेड जिल्ह्यात तीन वर्ष अपर पोलीस अधिक्षक आणि त्यातील एक वर्ष पोलीस अधिक्षक पदाचा अतिरिक्त भार असे तीन वर्ष काम केले आहे. सोबतच त्यांनी आपल्या पोलीस जीवनाची सुरूवात परभणी जिल्ह्यातून केली हेाती. त्यानंतर त्यांची बदली लातूर येथे झाली होती. त्यामुळे पोलीस परिक्षेत्राच्या चार जिल्ह्यांपैकी तीन जिल्हंयाचा भरपूर अभ्यास आहे. तसेच तळागळापासून उच्च पदापर्यंत ओळखी आहेत. त्यामुळे जिल्ह्यात टाचणी पडली तरी त्यांना आवाज पोहचतो.
सर्वप्रथम गुटखा, जुगार, मटका आणि बेकायदा रेती यावर त्यांनी आपली कडक नजर फिरवली आणि त्यामुळे हे सर्व धंदे पडद्याआड गेले.पण काही दलालांच्या मेहनतीने हे धंदे हळूहळू सुरू झाले. त्यावर पुन्हा शहाजी उमाप यांनी जरब बसवली. पण अवैध वाळू हा कारभार काही थांबला नाही. त्यात तर एक पोलीस अधिकारी आणि काही पोलीस अंमलदारांना शहाजी उमाप यांनी पैसे घेतल्याबरोबर निलंबित केले होते. तरी पण वाळूचा व्यवसाय सुरू राहिला. या सुरू राहण्यामागची अनेक कारणे आहेत. ती सर्व लिहिता पण येतील. पण पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होतील. म्हणून ते आम्ही टाळत आहोत.
काल पोलीस उपमहानिरिक्षकांनी नांदेड शहर वगळता सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत गुन्हे परिषद घेतली. ज्यामध्ये पोलीस अधिक्षक, दोन अपर पोलीस अधिक्षक, शहर विभागाचे पोलीस उपअधिक्षक वगळता सर्व पोलीस उपअधिक्षक, शहरातील पोलीस निरिक्षक वगळता इतर सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थितीत होते. या प्रसंगी शहाजी उमाप यांनी अत्यंत भावनिक शब्दात प्रश्न विचारला की, बंद झालेली वाळू कशी सुरू झाली. पण शहाजी उमाप यांच्या या भावनिक प्रश्नाचे उत्तर कोणालाच देता आले नाही. शहाजी उमाप यांच्या मनातील ही भावना कोणाला कळली आणि कोण त्यावर काम करणार या प्रश्नाचे उत्तर तर शोधावेच लागेल.
Post Views: 582
Leave a Reply